Ticket Scam Alert : AI ने बनवला एसी लोकल पास, पण एका चूकीनं सगळं बोंबललं! पोलिसांनी अंबरनाथच्या कपलला कसं पकडलं?
Last Updated:
Ticket Scam Alert : अंबरनाथ येथील उच्चशिक्षित इंजिनिअर दाम्पत्याने एआयच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार केला. सतर्क टीसीने पास तपासला असता फसवणूक उघड झाली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
मुंबई : दररोज कामाच्या निमित्ताने प्रवास करण्यासाठी मुंबईकर लोकल ट्रेनचा वापर करत असतात. लाखोंच्या संख्येने वापर करत असताना काहीजण तिकीट काढतात तर काहीजण महिन्याचा पास काढून प्रवास करतात, मात्र चक्क काही पैसे वाचवण्यासाठी एका दाम्पत्याने चक्क AI चा वापर करुन बनावट पास तयार केला आहे. पण ही त्यांची लबाडी पोलिसांना कशी समजली ते सविस्तर जाणून घेऊयात.
उच्च शिक्षित दांपत्याला हुशारी पडली महागात!
गेल्या काही वर्षात एआयचा वापर वाढलेला आहे. मात्र याच तंत्रज्ञानाचा वापर करुन दाम्पत्यातील पतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनावट डिजिटल पास तयार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा पास त्यांनी कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी केला होता. टीसीच्या जागरूकतेमुळे संपूर्ण प्रकरण समोर आले आणि शेवटी या दोघांना थेट तुरुंगात धाडण्यात आले.
advertisement
काय होती ही चूक?
मिळालेल्या माहितीनुसार,बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळच्या गर्दीच्या वेळेत एसी लोकलमध्ये नियमित तिकीट तपासणी सुरू होती. टीसी विशाल नवले हे प्रवाशांची तिकिटे तपासत असताना त्यांना आरोपी महिलेचा पास पाहताना संशय आला. त्यांनी दाखवलेला डिजिटल पास अधिकृत UTS ॲपवर नसून थेट गुगल क्रोम ब्राउझरवर उघडलेला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल पाससाठी आवश्यक असणारा QR कोड त्यात नव्हता.
advertisement
मग टीसीचा संशय वाढताच टीसीनी पासवरील क्रमांक रेल्वे हेल्पलाईनवर तपासला. या तपासणीत उघड झाले की पासाची वैधता संपलेली होती. शिवाय तो पास त्या महिलेच्या नावावर नसून त्यांच्या पतीच्या नावावर होता. यानंतर टीसीने महिला प्रवासीची चौकशी केली, ज्यात त्यांनी कबूल केले की हा पास त्यांच्या पतीनेच AI च्या मदतीने तयार करून दिला होता.
advertisement
दोघांनी एकाच बनावट पासवर प्रवास करून रेल्वे प्रशासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यावर टीसी यांनी तत्काळ कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी दोघांना अटक करून फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ticket Scam Alert : AI ने बनवला एसी लोकल पास, पण एका चूकीनं सगळं बोंबललं! पोलिसांनी अंबरनाथच्या कपलला कसं पकडलं?








