पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक नियोजनासाठी काही मार्गात बदल केले आहेत. पुण्यात देखावे पाहण्यासाठी बाहेर पडण्याआधी वाहतूक मार्गातील बदल पाहूनच बाहेर पडा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय. पुणे शहराच्या मध्य वस्तीमधील १४ रस्त्यांवर वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असंही वाहतूक पोलिसांनी सांगितलंय.
advertisement
गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने वाहतूक पोलिसांनी ११ ते १८ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री गर्दी संपेपर्यंत शहराच्या मध्य वस्तीमधील १४ रस्त्यांवर वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.
असे असतील बंद रस्ते व पर्यायी मार्ग
लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते टिळक चौक रस्ता बंद.पर्यायी मार्ग : डुल्या मारुती चौकातून उजवीकडे वळून दुधभट्टीवरून सरळ दारूवाला पुलाकडे जाता येईल.हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्ताने सरळ घोरपडी पेठ पोलिस चौकीपासून पुढे शंकर शेठ रस्त्याने जावे.
शिवाजी रस्ता : स. गो. बर्वे ते जेधे चौक रस्ता बंद
पर्यायी मार्ग : शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जे. एम. रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. सिमला चौक-कामगार पुतळा चौक-शाहीर अमर शेख चौक बोल्हाई चौकमार्गे नेहरु रस्त्याचा वापर करून स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा.
बाजीराव रस्ता : पूरम चौक ते आप्पा बळवंत चौक रस्ता बंद
पर्यायी मार्ग : पूरम चौक, टिळक रस्ताने टिळक चौकातून उजवीकडे वळून केळकर रस्ताने अप्पा बळवंत चौक.
टिळक रस्ता : मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक रस्ता बंद
पर्यायी मार्ग : जेधे चौक, नेहरू स्टेडीयम समोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळ्याकडून उजवीकडे वळून पुरम चौक व हिराबाग