शितल आव्हाड नावाच्या महिला ट्रॅफिक हवालदारांनी वाहन चालकांना इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत एक कळकळीची विनंती केली आहे. महिला हवालदार व्हिडिओमध्ये म्हणतात की, "आमच्याकडे सर्वाधिक भांडणं ही रिक्षा चालकांमधील आणि इतर वाहनांमधील येतात. काही रिक्षा चालक व्यवस्थित नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपलं वाहन चालवत असतात, पण काही रिक्षा चालक भाडं दिसलं की, रस्त्यावरच डायरेक्ट गाडी थांबवतात किंवा पटकन रिक्षा वळवतात. त्यामुळे रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यावरच ड्रायव्हरमध्ये वाद होतात."
advertisement
"त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. पोलिस चौकीच्याच बाहेर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. उगाचच वाद होण्यापेक्षा आधीपासूनच रिक्षा चालकांनी सुरळीत ड्रायव्हिंग करावी, भांडणं करू नका." असं या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक हवालदार म्हणतायत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकदा वाहतूक विभागाकडून ड्रायव्हर्सला व्यवस्थित वाहन चालवण्याचे आवाहन केले जाते. जनजागृती केली जाते, पोस्टर्सच्या माध्यमातूनही ड्रायव्हिंग बद्दल जनजागृती केली जाते. असं असलं तरीही ड्रायव्हर्स शेवटी जी चूक करायची ती चूक करतातच.