बाजीराव रस्ता आणि मध्यवर्ती भागातील बदल
बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आज दुपारी ४ नंतर आवश्यकतेनुसार प्रवेश बंद केला जाईल.
पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी पुरम चौकातून बाजीराव रस्त्याऐवजी डावीकडे वळून टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक आणि खंडोजीबाबा चौकामार्गे इच्छित स्थळी जावे.
लष्कर भागातील एमजी रोडवर निघणाऱ्या मिरवणुकीमुळे या परिसरातील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद केले जातील
advertisement
१. वाय जंक्शन: वाय जंक्शनवरून एमजी रोडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
२. १५ ऑगस्ट चौक: मिरवणूक पुढे गेल्यानंतर येथील वाहतूक उजवीकडे किंवा डावीकडे वळवण्यात येईल.
३. महंमद रफी चौक: या चौकातील वाहतूक ईस्ट स्ट्रीट रोडकडे वळवण्यात येईल.
४. कोहिनूर हॉटेल: एमजी रोडकडे येणारी वाहतूक भोपळा चौकातून कुरेशी मशीद किंवा सेंटर स्ट्रीट मार्गावर वळवण्यात येईल.
५. होल्गा चौक: येथून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती थेट इंदिरा गांधी चौकाकडे वळवली जाईल.
मिरवणुका संपेपर्यंत हे बदल लागू राहतील. विनाकारण होणारा मनस्ताप टाळण्यासाठी नागरिकांनी या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
