ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पोस्टल शुल्क वाढले
ही सेवा मुख्यतः वाहनचालकांनी लायसन्ससाठी परीक्षा दिल्यानंतर किंवा नवीन वाहन खरेदी केल्यानंतर लागू होते. घरपोच सेवा मिळाल्यामुळे नागरिकांना वेळ वाचतो आणि कार्यालयात जाऊन थांबण्याची गरज राहत नाही. परंतु आता या सेवेत वाढलेला खर्च नागरिकांच्या खिशावर थोडीशी झळ ठोठावणार आहे.
परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या सूचनेनुसार घरपोच सेवांसाठी शुल्क वाढविणे आवश्यक होते. टपाल विभागाबरोबर करार असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि जलद सेवा मिळेल.
advertisement
घरपोच लायसन्ससाठी नवीन शुल्क किती?
सध्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. नागरिकांनी नवीन शुल्काची तयारी ठेवावी. घरपोच सेवा मिळाल्यामुळे नागरिकांना आरसी बुक किंवा परवाना मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ वाचतो आणि सरकारी कार्यालयातील गर्दीतून सुटका होते. त्यामुळे नागरिकांना आता आता ते 70 रुपये द्यावे लागणार आहेत. अशी घरपोच सेवा पुण्यातील वाहनधारकांसाठी सोयीची असली तरी थोडे महागलेले शुल्क आता नागरिकांना भरावे लागणार आहे.
