TRENDING:

मुंबईतील करणचा पुण्याच्या तरुणीसोबत मोठा गेम; आधी प्रेम, मग हडपले लाखो, शेवटी मोबाइलही घेऊन पसार, चक्रावून टाकणारं प्रकरण

Last Updated:

"मी कर्जाचे हप्ते नियमित भरेन," असे खोटे आश्वासन देऊन त्याने तरुणीकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये घेतले. एवढ्यावरच न थांबता, "दोन तासांसाठी तुझा फोन पाहिजे," असे सांगून त्याने तरुणीचा ७५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल देखील स्वतःकडे घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मैत्री, प्रेम आणि लग्नाचं खोटं आमिष दाखवून एका तरुणीची केवळ शारीरिकच नाही, तर आर्थिक फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आरोपीने तरुणीच्या नावावर अडीच लाखांचे कर्ज काढायला लावले आणि तिचा महागडा मोबाईल घेऊन तो चक्क पसार झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीची प्रियकराकडून फसवणूक (AI Image)
तरुणीची प्रियकराकडून फसवणूक (AI Image)
advertisement

मैत्रीच्या जाळ्यात ओढून 'गेम'

मिळालेल्या माहितीनुसार, मनप्रीत सिंग केंथ उर्फ करन (वय ३५, रा. मालाड वेस्ट, मुंबई) याने एका २६ वर्षीय तरुणीशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. हा सर्व प्रकार जून २०२५ पासून ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला.

विश्वास संपादन करून आर्थिक लुटमार

advertisement

तरुणीचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने तिला स्वतःच्या गरजांसाठी लोन काढण्यास भाग पाडले. "मी कर्जाचे हप्ते नियमित भरेन," असे खोटे आश्वासन देऊन त्याने तरुणीकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये घेतले. एवढ्यावरच न थांबता, "दोन तासांसाठी तुझा फोन पाहिजे," असे सांगून त्याने तरुणीचा ७५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल देखील स्वतःकडे घेतला. त्यानंतर आरोपीने आपले तिच्यासोबतचे सर्व संपर्क बंद केले आणि तो पसार झाला.

advertisement

विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

आपली शारीरिक आणि आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनप्रीत सिंग याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
मुंबईतील करणचा पुण्याच्या तरुणीसोबत मोठा गेम; आधी प्रेम, मग हडपले लाखो, शेवटी मोबाइलही घेऊन पसार, चक्रावून टाकणारं प्रकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल