TRENDING:

धक्कादायक! सारा लिफ्टनं इमारतीच्या 8 व्या मजल्यावर गेली; चप्पल काढली अन् टोकाचं पाऊल, पुण्यात काय घडलं?

Last Updated:

शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ती लिफ्टने इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या 'रिफ्युज गॅलरी'मध्ये गेली. तिथे तिने आपली चप्पल काढली आणि थेट खाली उडी घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वाघोली : पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. भावडी रस्त्यावरील एका नामांकित सोसायटीमध्ये १८ वर्षीय तरुणीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी (प्रतिकात्मक फोटो)
इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

सारा लालमन अंधारे (वय १८, मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सारा ही गेल्या वर्षभरापासून आपल्या आईसह वाघोली येथील मामाच्या घरी राहत होती. ती अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होती. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ती लिफ्टने इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या 'रिफ्युज गॅलरी'मध्ये गेली. तिथे तिने आपली चप्पल काढली आणि थेट खाली उडी घेतली.

advertisement

Pune News: समोर दिसायची गिफ्ट शॉपी अन् किराणा मालाची दुकानं; पण पडद्याआड सुरू होतं काळं कांड, पुण्यात मोठी कारवाई

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या साराला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, साराने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा निष्कर्ष काढला जात आहे, मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

वाघोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, साराच्या कुटुंबियांकडे आणि मित्रांकडे चौकशी केली जात आहे. ऐन तारुण्यात एका मुलीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! सारा लिफ्टनं इमारतीच्या 8 व्या मजल्यावर गेली; चप्पल काढली अन् टोकाचं पाऊल, पुण्यात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल