Pune News: समोर दिसायची गिफ्ट शॉपी अन् किराणा मालाची दुकानं; पण पडद्याआड सुरू होतं काळं कांड, पुण्यात मोठी कारवाई
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वाघोली परिसरात यापूर्वीही अमली पदार्थांचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींची वरकरणी गिफ्ट शॉप, मोबाईल शॉपी, किराणा किंवा फर्निचर अशी व्यावसायिक दुकाने आहेत
वाघोली: पुणे शहर परिसरात अमली पदार्थांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेत वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मॅफेड्रॉन (MD) या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या हनुमान रूपाराम चौधरी (वय ३३, रा. वडगाव मावळ) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २८ लाख रुपये किमतीचे १३४ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.
व्यावसायिक दुकानाच्या नावाखाली तस्करी
वाघोली पोलिसांनी केलेल्या तपासात एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाघोली परिसरात यापूर्वीही अमली पदार्थांचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींची वरकरणी गिफ्ट शॉप, मोबाईल शॉपी, किराणा किंवा फर्निचर अशी व्यावसायिक दुकाने आहेत. मात्र, या दुकानांच्या पडद्याआड ड्रग्ज विक्रीचा काळा व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. राजस्थानमधील काही व्यावसायिक या तस्करीमध्ये गुंतलेले असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
advertisement
पोलीस पथकाची कामगिरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाघोली परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या हनुमान चौधरीला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त केलेले २८ लाखांचे एमडी ड्रग्ज पुणे शहरातील तरुण पिढीला लक्ष्य करण्यासाठी आणले होते का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
advertisement
या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे आणि या ड्रग्जचा मुख्य स्त्रोत (Supply Chain) कोठून येतो, याचा सखोल तपास वाघोली पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 7:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: समोर दिसायची गिफ्ट शॉपी अन् किराणा मालाची दुकानं; पण पडद्याआड सुरू होतं काळं कांड, पुण्यात मोठी कारवाई







