advertisement

Pune News: पुण्यात रोज घरी यायची मैत्रीण, घरातल्या सगळ्या हालचाली बघायची, शेवटी धक्कादायक कांड, सगळे हादरले

Last Updated:

फिर्यादीच्या मुलीची मैत्रीण घरी नेहमी येत असे. या दरम्यान तिने घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने कोठे ठेवले जातात, याची गुपचूप माहिती काढली.

मैत्रिणीनेच केली चोरी (प्रतिकात्मक फोटो)
मैत्रिणीनेच केली चोरी (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड: घरात नेहमी ये-जा असलेल्या एका मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीच्या घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे समोर आली आहे. विश्वासाचा गैरफायदा घेत या तरुणीने सुमारे २ लाख ४१ हजार ४५० रुपये किमतीचे दागिने लंपास केले.
विश्वासाला तडा
चिंचवडमधील एका महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलीची मैत्रीण घरी नेहमी येत असे. या दरम्यान तिने घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने कोठे ठेवले जातात, याची गुपचूप माहिती काढली. १७ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत, सर्वांची नजर चुकवून तिने कपाटातील ४६.२९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरात नेहमीची ये-जा असल्याने सुरुवातीला कोणालाच संशय आला नाही. मात्र दागिने गायब असल्याचे लक्षात येताच हा प्रकार उघडकीस आला.
advertisement
बँकेबाहेर महिलेची पर्स कापली
दुसरी एक घटना भोसरीतील लांडेवाडी परिसरात घडली. बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या एका महिलेच्या पर्समधून १० हजार रुपये चोरणाऱ्या दोन महिलांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. आसाना सिसोदीया (३२) आणि ललिता सिसोदीया (३०, दोन्ही रा. मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी महिलेने बँकेतून ६० हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवले होते. गर्दीचा फायदा घेत या आरोपींनी हातसफाई केली होती.
advertisement
पिंपरी-चिंचवड पोलीस सध्या दोन्ही प्रकरणांचा सविस्तर तपास करत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर किंवा घरात येणाऱ्यांवर विश्वास ठेवताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात रोज घरी यायची मैत्रीण, घरातल्या सगळ्या हालचाली बघायची, शेवटी धक्कादायक कांड, सगळे हादरले
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement