नेमकी घटना काय?
वारजे माळवाडी येथील गोकुळनगर पठार भागात आदिनाथ देवडकर हे पत्नी छाया (वय २८) आणि दोन वर्षांची मुलगी शारवी यांच्यासह राहत होते. चिमुरड्या शारवीला जन्मतःच अस्थिविकार (हाडांचा आजार) होता, ज्यावर उपचार सुरू होते. मात्र, मुलीच्या या आजारपणामुळे आई छाया प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात होती.
शुक्रवारी (२ जानेवारी) दुपारी आदिनाथ जेव्हा कामावरून घरी परतले, तेव्हा घरातील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगी शारवी पाळण्यात निपचित पडली होती, तिचे हात-पाय चिकटपट्टीने बांधलेले होते. तर पत्नी छायाने गळफास घेतलेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छायाने आधी मुलीचा दोरीने गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर स्वतःचे आयुष्य संपवले.
advertisement
वारजे घटनेप्रकरणी मृत आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कापसे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा करूण अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
