काय आहे उपक्रम सुरु करण्यामागचा उद्देश?
पुण्यातील सोशल समिधा फाऊंडेशनने हा उपक्रम सुरु केला आहे. या फाऊंडेशनचे अध्यक्ष लेशपाल जवळगे आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. याबद्दल माहिती देताना लेशपाल जवळगे यांनी सांगितले की बालपणापासून वाचनाच असं काही वातावरण नसत. मी देखील गावाकडून आलं आहे. फलटणला शाळेत होतो त्यानंतर 9 ते 10 वी मध्ये गेल्यानंतर वाचनाची आवड निर्माण झाली. पण वाचणासाठी प्रोत्साहित करणार कोणी नव्हते. आपण जे घडतो ते वाचणामुळे घडत असतो.
advertisement
इंजिनिअरिंग सोडली अन् आज 35 देश पोहोचलं नाव, धाराशिवच्या तरुणाची कहाणी
कारण प्रत्येक गोष्ट आपण घरातूनच शिकतो असं नाही. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील पुस्तकांचा प्रभाव होता. आता वाचन कुठं तरी लोप पावत आहे. त्याच्याकडे आताच्या मुलांचा बघण्याचा दृष्टीकोन कमी आहे. सोशल मीडियाचा वापर मुलं जास्त करतात. मग वाचन होत नाही त्यामुळे आमच्या टीमने असं ठरवलं की ग्रामीण भागात जाऊ मुलांना वाचनाच महत्व सांगू आणि त्याना पुस्तक देऊ त्यातून त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, असं लेशपाल जवळगे सांगतात.
काय आहे नेमका हा उपक्रम
मुलांना एक उपक्रम देखील आम्ही दिला आहे. 26 जानेवारी पर्यंत हे पुस्तकं वाचा आणि त्याच्यावर रिव्ह्यू लिहा जो कोणी छान रिव्ह्यू लिहिलं त्याला बक्षीस प्राईझ मनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणार आणि हे बक्षीस देण्यामागच कारण असं की मुलांना आपण वाचल्यानंतर आपल्याला काही तरी भेटणार आहे. त्या उत्सुकतेने तरी मुलं वाचतील हा आमचा दृष्टीकोन आहे. या वर्षी याला भेटला तर पुढच्या वर्षी मला भेटेल याने उत्सुकता ताणली जाईल असा हा छोटासा उपक्रम हाती घेतला आहे. मी देखील ग्रॅज्युएशनला होतो तेव्हा माझ्या मध्ये आरोगन्स होता. वाचनाने तो मला जाणवतो आहे की आधीचा मी आणि आताचा मी यामध्ये खूप फरक आहे,असं लेशपाल जवळगे सांगतात.
उपक्रमाचे फायदे काय आहेत
सोशल मीडिया तर पाहिजेच पण मर्यादित त्याच्यावर पर्याय काय तर वाचन करा याने काय होईल तर मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात जातील आणि वाचनाचा त्याना फायदा होईल त्यांच्या जडण घडणीत ते दिसणार आहे. जो आपल्या वागण्यातून बोलण्यातून तसेच आपल्या दैनंदिन जीवनात देखील त्याचा परिणाम होतो जो प्रत्यक्ष दिसत नाही पण अप्रत्यक्ष रित्या तो होत असतो. हेच वाचन संस्कृती मुलांनमध्ये रुजावी या दृष्टीने पहिलं पाऊल उचल आहे. सोशल समिधाच्या नावाखाली आम्ही 10 एक जण एकत्र आलो आहोत जे सर्वांना वाचनाची आवड आहे आणि फक्त आपण वाचून चालणार नाही तर लोकांनपर्यंत घेऊन गेलं पाहिजे ज्या ग्रामीण भागात जात आहोत त्या लोकांना यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेत आहोत, असंही लेशपाल जवळगे सांगतात.
आता पर्यंत कुठल्या भागात राबवले उपक्रम
येसाजी कंक यांच्या गावापासून सुरुवात करण्यात आली आहे. 15 ऑगस्टला ही सुरुवात केली. त्यानंतर आळंदीच्या पुढे एक अंथाश्रलय आहे तिथे देखील मुलांना पुस्तके दिली आहेत. मुलं पुस्तक दिल्यानंतर जी खुश होत आहेत ना तर त्यांचा चेहऱ्यावरचा आनंदच काही वेगळा आहे. व ते एक खूप मोठं समाधान आहे, अशी माहिती लेशपाल जवळगे यांनी सांगितली आहे.