नेमकं काय म्हणाले शरद पवार?
मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की पुण्याचं एक वेगळं असं ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला. त्यांचं बालपण देखील इथेच गेलं. आज ज्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होती. तो सर्जिकल स्ट्राईक पहिल्यांदा महाराजांनी लाल महालामध्ये केला होता. इतर राज्य संस्थानं त्यांच्या नावानं ओळखली जातात. मात्र शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं ते हिंदवी स्वराज्य रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं.
advertisement
याच पुण्यात टिळकांनी स्वराज्याची मशाल पेटवली, गुलामगिरीविरोधात लढा उभारला. पुण्यात दोन गट होते एक जहाल आणि मवाळ जहाल गटाचं नेतृत्व टिळकांनी केलं. स्वातंत्र्यात टिळकांचं मोठं योगदान आहे. टिळकांनी पत्रकारितेला आपलं शस्त्र बनवलं. पत्रकारितेवरचा दबाव त्यांनी झुगारून लावला. पत्रकारितेवर कोणाचा दबाव असता कामा नये या मताचे टिळक होते असं पवार यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, टिळक पुरस्काराला एक आगळं -वेगळं महत्त्व आहे. आतापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार मिळाला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.