आज शनिवार १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत मारुती मंदिर (शिवणे) ते नांदेड पूल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
वीजपुरवठा सुधारण्यासाठी काम
शिवणे येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे, वारजे, कोंढवे–धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे आणि लगतच्या गावांमध्ये वीजपुरवठा अधिक चांगला आणि सुरळीत होण्यासाठी हे काम नियोजित आहे. रस्त्यावर काँक्रिट खोदून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम होणार असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवला जाईल.
advertisement
Pune Traffic: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, प्रमुख रस्ते बंद, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग
पर्यायी रस्त्यांचा वापर करावा
हा रस्ता अरुंद असल्यामुळे कामाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावले जातील. यामुळे वाहनचालकांनी आणि नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.
कामादरम्यान नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी ही सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी: शिवणे, वारजे, कोंढवे–धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, धायरी आणि किरकटवाडी या परिसरातील नागरिकांनी वीजपुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे असल्याने सहकार्य करावे, अशी अपेक्षा महावितरणने व्यक्त केली आहे.
