क्षुल्लक वादातून पतीने घेतला पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न
पीडित महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संदेश लाजरस चोपडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती सतत पत्नीवर तिच्या आईचे घर विकून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. या कारणावरून त्याने पत्नीला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
advertisement
इतकेच नव्हे तर आरोपीने कमरेचा पट्टा वापरून अमानुष मारहाण केली. संतापाच्या भरात त्याने घरातील मोठ्या लोखंडी कुलपाने पत्नीच्या डोक्यावर वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Shocking Crime : धक्कादायक! त्या गोष्टीसाठी पती बनला हैवान,लोखंडी कुलपाने पत्नीच्या डोक्यावर वार
