TRENDING:

'19 डिसेंबरला मोठं घडणार, पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल' पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

Last Updated:

बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. होणार ही लोकंच आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड: " येत्या 19 डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. इस्त्राईलच्या गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.  कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो' असं वक्तव्य  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. याआधीही त्यांनी ट्वीट केलं होतं. या ट्वीटबद्दलचा खुलासाही त्यांनी केला.
News18
News18
advertisement

पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पृथ्वीराज चव्हाण उपस्थितीत होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस असेल, अशी एक पोस्ट ट्वीट  केली होती.  त्या पोस्टचा नेमका संदर्भ काय होता. याबाबत खुलासा करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

advertisement

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

"जगात बरंच काही चाललं आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केलं होतं. ते ट्वीट खूप व्हायरल झालं होतं. मी म्हटलं होतं की, कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले. याचा अर्थ काय आहे. कोण म्हटलं तुम्ही होणार आहात का? तर कुणाला याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता मराठी माणूस होणार म्हणजे, आता बसलेल्या माणसाला बाजूला व्हावं लागेल, मी आधीच अधोरेखीत केलं आहे, नाव न घेता. बहुतेक बदल घडण्याची शक्यता आहे. बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. होणार ही लोकंच आहे. कदाचित यातला मराठी माणूस होईल.  माझा अंदाज आहे, १९ डिसेंबर रोजी हे घडेल. अमेरिकेच्या संसदेत कायदा केला आहे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही आहे तो कायदा झाला आहे. त्या कायद्यामध्ये अमेरिकेत एक एमस्टिन नावाचा माणूस होता, हा इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अमेरिकेत धुमाकूळ घातला आहे. त्याचा पर्दाफाश होणार आहे' असा दावाच चव्हाण यांनी केला.

advertisement

तसंच, "या गुप्तहेराने मोठ मोठ्या बंगल्यामध्ये कॅमेरे ठेवून लोकांचे छायाचित्र काढले आहे. ती सगळी छायाचित्रणं कायदा करून अमेरिकन सरकार १९ डिसेंबर रोजी जाहीर करणार आहे. यात कुणा कुणाची नावं आहे, हे कळेल.  सोशल मीडियावर काही नावं आहे. पण चर्चा चालू आहे. आजच ७५ हजार फोटोस् जाहीर झाले आहे. २० हजार ई-मेल्स प्रकट झाले आहे. त्यामध्ये अमेरिकेन संसदेनं सांगितलं आहे की, हा डाऊनलोडेट डेटा पाहिजे. सर्च करता आला पाहिजे. कोण कितीही मोठा माणूस असला तरी त्याला संरक्षण देणार नाही' असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं लावलं डोकं, डाळिंबाच्या बागेत घेतलं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात
सर्व पहा

"आता ही माहिती १९ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे काय होईल माहिती नाही, नाव आहे, काय काय त्यांनी पराक्रम केला आहे. ते समोर येणार आहे. त्यामुळे आशा आहे, काही तरी होईल, हे ठरवून आम्ही पुढे चाललो आहे' असंही चव्हाण म्हणाले.

मराठी बातम्या/पुणे/
'19 डिसेंबरला मोठं घडणार, पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल' पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल