भावनांचा आदर केला पाहिजे - सुप्रिया सुळे
ठिके ना... मराठ्यांचा तेवढा तरी हक्क आहे. आंदोलन जेव्हा केलं जातं तेव्हा काही युवा पोरं असतात आणि मी लोकप्रतिनिधी आहे, माझी नैतिक जबाबदारी आहे की, त्यांच्या भावनांचा आदर मी केला पाहिजे. यातून मार्ग काढणं ही माजी जबाबदारी आहे. पाटलांना थकवा आला होता, त्यामुळे जास्त बोलणं झालं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
बीएमसीला माझी मागणी आहे की...
मला महाराष्ट्राचं खरंच कौतूक वाटतं. आज मुंबईतील आंदोलकांची काळजी घेतली जात आहे. शेतकरी कोणताही विचार न करता फळ पाठवत आहेत. माताभगिणी ट्रक भरून रसद पुरवत आहेत. याचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. पण माझी बीएमसीला माझी मागणी आहे की, त्यांनी स्वत: राखली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकार फेल ठरलंय - सुप्रिया सुळे
आंदोलनाला जबाबदार आत्ताच सरकार आहे, आंदोलन हाताच्या बाहेर नाही, सरकारला विनम्र विनंती करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांशी चर्चा करा जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा, अधिवेशन बोलावा, 24 तासात हे सगळं मान्य करून टाका मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा, गृहखात्याला माहिती आहे तर आम्हाला पण कळू द्या. गृहखाते नाही तर सरकार फेल ठरले आहे, जबाबदारी सगळी घ्यायची असते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे.