TRENDING:

रेल्वेचा मोठा निर्णय! पुणे-नांदेड एक्सप्रेसला मिळाला नवीन थांबा; आता पुणे ऐवजी हे स्टेशन गाठा

Last Updated:

Pune Railway News : मध्य रेल्वेने हजर साहिब नांदेड-पुणे एक्सप्रेसच्या टर्मिनसमध्ये बदल केला आहे. ही गाडी आता पुणे स्थानकाऐवजी हडपसर येथे थांबणार आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हजर साहिब नांदेड-पुणे एक्सप्रेसच्या टर्मिनसमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे रेल्वे स्थानकावर येणारी ही गाडी आता थेट हडपसर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळापत्रकात तसेच मार्ग नियोजनात बदल होणार आहे.
News18
News18
advertisement

पुणे-नांदेड एक्सप्रेसला मिळाला नवीन थांबा

गाडी क्रमांक 17630 हजर साहिब नांदेड–पुणे एक्सप्रेस आता पुणे स्टेशनऐवजी हडपसर स्थानकावर सकाळी 4.35 वाजता पोहोचणार आहे. या बदलामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील प्रवाशांना अधिक सोयीचा लाभ मिळणार आहे. विशेषतः हडपसर, मांजरी, फुरसुंगी आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी हा बदल उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान, हडपसर स्थानकावर उतरल्यानंतर पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी रेल्वे सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हडपसर येथून सकाळी 5.25 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 11422 सोलापूर–पुणे डेमू ट्रेन प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या डेमू ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना सहजपणे पुणे स्टेशनपर्यंत पोहोचता येणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सुगंध आणि सौंदर्याचा अनोखा संगम, पुण्यात इथं भरलंय पुष्पप्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन केले आहे तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे. हा बदल तात्पुरता की कायमस्वरूपी याबाबत पुढील सूचना रेल्वेकडून दिल्या जाणार आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
रेल्वेचा मोठा निर्णय! पुणे-नांदेड एक्सप्रेसला मिळाला नवीन थांबा; आता पुणे ऐवजी हे स्टेशन गाठा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल