पुणे-मुंबई प्रवास होणार 'स्मार्ट'
या प्रकल्पांतर्गत पागोटे ते चौक या सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या टप्प्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या विभागासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी सुमारे 70 टक्के भूसंपादन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केले आहे. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
काम कधी पूर्ण होणार?
advertisement
दरम्यान या द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी एनएचएआयने निविदा मागविल्या होत्या आणि त्या येत्या 15 ते 20 दिवसांत अंतिम केल्या जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
सहा मार्गिकांचा हा द्रुतगती महामार्ग सुमारे 3500 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे. पुणे ते बंगळूरु द्रुतगती मार्ग आधीच विकसित करण्यात येत असून त्याचा थेट मुंबईपर्यंत विस्तार केल्याने राज्यातील तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूक अधिक चांगली होणार आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन आर्थिक, औद्योगिक आणि व्यापारी हालचालींना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
