गुरुचा कर्क राशीत प्रवेश
1 जून 2026 रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर गुरुची दृष्टी चार, आठ आणि बारा या स्थानांवर पडते. या स्थितीत गुरुची दृष्टी काही राशींसाठी घातक मानली जाते आणि त्यामुळे गुरुपीडा निर्माण होते.
advertisement
कोणत्या राशींना गुरुपीडा भोगावी लागणार?
दाते पंचांगानुसार,
मेष, सिंह आणि धनु या तीन राशींना 2026 मध्ये गुरुपीडेला सामोरे जावे लागणार आहे.
या काळात या राशींच्या लोकांना आर्थिक अडचणी, कामाच्या ठिकाणी ताणतणाव, आरोग्याशी संबंधित त्रास, मानसिक अस्वस्थता, यांचा सामना करावा लागू शकतो.
गुरुपीडेवर उपाय काय?
गुरुपीडेचा प्रभाव कमी करण्यासाठी काही निश्चित उपाय सांगितले आहेत.
दर गुरुवारी बृहस्पती मंत्राचा जप करावा. गुरुवारी दानधर्म करावा. 1 जून 2026 रोजी दत्त मंदिरात जाऊन गुळाची ढेप, साखर, पिवळे फूल, केळी अर्पण करावे.
हे उपाय केल्याने गुरुपीडेचा त्रास कमी होतो.
गुरु 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कर्क राशीत राहणार आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहबदलानंतर वृषभ, कन्या आणि मकर या राशींनाही गुरुपीडेचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे या राशींच्या लोकांनीही गुरु उपासना आणि दान करणे आवश्यक आहे.
नवीन वर्षासाठी काय करावं?
2026 हे वर्ष काही राशींसाठी संयमाचं आणि श्रद्धेचं असणार आहे. गुरुपीडा असली तरी योग्य उपासना, जप आणि दान केल्यास तिचा परिणाम कमी करता येतो. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच योग्य धार्मिक आणि मानसिक तयारी करणं महत्त्वाचं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





