Makar Sankrati Astro: 200 वर्षांनी अशी मकर संक्रात! ग्रहांचा खेळ अन् त्रिगृही योग या राशींना गोड बातमी देणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: नवीन वर्षात भाग्याची साथ लाभणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळेच आशा लावून बसलेले असतात, पण फायदा काहीच राशीच्या लोकांना होणार आहे. वर्ष 2026 च्या सुरुवातीला अनेक ग्रह राशी परिवर्तन करून राजयोग आणि इतर शुभ योगाची निर्मिती करतील.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्रिग्रही योग जुळत आहे, त्या योगाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. उर्जा, सन्मानाचा कारक सूर्य, सुख-सुविधांचा कारक शुक्र आणि ग्रहांचा सेनापती मंगळ मिळून त्रिग्रही योग तयार करणार आहेत. यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच या लोकांना नवीन नोकरीसह अपार धनलाभाचे योग बनत आहेत, सगळ्याच कामात मन प्रसन्न राहील. जाणून घेऊया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
वृश्चिक - तुमच्यासाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. तसेच या काळात तुम्हाला परदेशातून लाभ होऊ शकतो. पैशांशी संबंधित प्रकरणांमध्ये अनपेक्षित यश मिळेल. नोकरी आणि व्यवसाय दोन्हीमध्ये प्रगतीचे योग आहेत. या काळात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
धनु - तुमच्यासाठी त्रिग्रही योगाची निर्मिती शुभ फलदायी ठरू शकते. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानी तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभाचे योग येतील. करिअर आणि शिक्षणात चांगल्या संधी पाहायला मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यावसायिक जीवनात सन्मान आणि करिअरमध्ये यश निश्चित होईल. या काळात धनलाभाचे नवीन स्रोत उघडतील. नातेसंबंधातील ताळमेळ वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









