Shocking Crime : धक्कादायक! त्या गोष्टीसाठी पती बनला हैवान,लोखंडी कुलपाने पत्नीच्या डोक्यावर वार

Last Updated:

Pimpri News : सासूकडील घर विकून पैसे आणण्याच्या मागणीवरून पतीने पत्नीवर अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना काळेवाडी येथे घडली. डोक्यात कुलपाने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

News18
News18
पुणे : पिंपरी शहरातून एक अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. सासूकडील घर विकून पैसे आणण्याच्या वादातून एका नराधम पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काळेवाडी परिसरात घडली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.
क्षुल्लक वादातून पतीने घेतला पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न
पीडित महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संदेश लाजरस चोपडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती सतत पत्नीवर तिच्या आईचे घर विकून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. या कारणावरून त्याने पत्नीला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
advertisement
इतकेच नव्हे तर आरोपीने कमरेचा पट्टा वापरून अमानुष मारहाण केली. संतापाच्या भरात त्याने घरातील मोठ्या लोखंडी कुलपाने पत्नीच्या डोक्यावर वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Shocking Crime : धक्कादायक! त्या गोष्टीसाठी पती बनला हैवान,लोखंडी कुलपाने पत्नीच्या डोक्यावर वार
Next Article
advertisement
Nagar Parishad Election Results: शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आली धक्कादायक आकडेवारी
शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल
  • शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल

  • शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल

  • शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल

View All
advertisement