Mutton : दुकानात सहज मागता मटण चाप; पण असतं काय, मटणाचा कोणता भाग, लोक इतका आवडीने का खातात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mutton Chops : मटण शॉपमध्ये गेलात की दुकानदाराला तुम्ही मटण चाप द्या असं सांगता. मटणाचे बरेच भाग आहेत, ज्याची वेगवेगळी नावं आहे. त्यात चाप सगळ्यात प्रसिद्ध. म्हणजे कुणाला मटणाच्या भागाची नावं माहिती नसतील किंवा काय घ्यायचं ते सुचत नसेल तर पटकन तोंडात चाप येतं आणि लोक तेच खरेदी करतात. पण हा चाप म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का?
मटण चाप ज्याला इंग्रजी मटण चॉप्स म्हणतात. जे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. तवा मटण चाप – तव्यावर मसाल्यात परतून बनवलेले. ग्रिल्ड मटण चाप – ओव्हन किंवा कोळशावर भाजलेले. फ्राय मटण चाप – तेलात किंवा तुपात खरपूस तळलेले. मसालेदार मटण चाप करी – थोड्या रस्स्यात शिजवलेले. महाराष्ट्रात मटण चाप सहसा कांदा, आलं-लसूण, लाल तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून बनवले जातात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









