advertisement

दादा गेले, पार्थ पवार अन् जय पवारांमध्ये वादाची ठिणगी? नेमकी चर्चा काय?

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: 28 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं.

News18
News18
Ajit Pawar Plane Crash: 28 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आता हा अपघात आहे की घातपात यावरून राज्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या कुटुंबात वादाची ठिणगी पडल्याची बातमी समोर आली आहे. दादा गेल्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात मतभेद झाल्याची माहिती माध्यमांमध्ये समोर आली आहे. काही प्रसारमाध्यमांनी याबाबतच्या बातम्या देखील दिल्या. मात्र असा कोणताही वाद दोघांमध्ये झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी चर्चा काय सुरू आहे?

खरं तर, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक आणि म्यूझियम बांधण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच स्मारकाच्या आणि म्यूझियमच्या ठिकाणावरून पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात मतभेद झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र यात तथ्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. सर्व बैठकींना जय पवार आणि पार्थ पवार हे दोघंही एकत्र हजेरी लावत आहेत. स्वतः जय पवार यांनी सारस्थ करत पार्थ पवार यांना सोबत घेऊन बैठकीला राहत होते.याबाबतचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
advertisement

दोघांमधील कथित वादाबद्दल चर्चा काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, जय पवार यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी) मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अजित पवार यांचे संग्रहालय पुणे शहरात करण्याची इच्छा व्यक्त केली. अजित पवार यांचे पुणे जिल्हा आणि शहरावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे स्मारक आणि संग्रहालय पुण्यात असावं, अशी भूमिका जय पवार यांनी मांडलीय. पुण्याच्या विकास आराखड्यात आणि शहराचा कायापालट करण्यामध्ये अजित पवार यांचे योगदान मोठे आहे.
advertisement

पार्थ पवारांची काय भूमिका

दुसरीकडे पार्थ पवार यांनी याउलट भूमिका घेतल्याचे समजते. पार्थ पवार यांच्या मते, अजित पवार यांचे स्मारक आणि संग्रहालय हे त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामतीत असायला हवे. बारामती ही पवारांची ओळख आहे त्यामुळे त्यांचे स्मारक बारामतीतच व्हावे, असा पार्थ यांचा आग्रह असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिलीय. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं सांगण्यात येतंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादा गेले, पार्थ पवार अन् जय पवारांमध्ये वादाची ठिणगी? नेमकी चर्चा काय?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement