advertisement

विषय संपला नाहीये..! तलवारीच्या धमकीनंतर बिग बॉसमधून हकालपट्टी, दिव्या शिंदेचा पहिला VIDEO समोर

Last Updated:

Divya Shinde Video : Bigg Boss Marathi 6 च्या घरात दिव्या शिंदेनं सदस्यांना तलवारीनं मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला बिग बॉसने घरातून बाहेर काढलं. घराबाहेर आल्यानंतर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. दिव्या शिंदे हिने घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  बिग बॉसच्या कडक नियमांनुसार हिंसा किंवा हिंसेची धमकी देणं गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे इतर सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसनं दिव्यावर कारवाई करत तिला घराबाहेर काढलं. घराबाहेर आल्यानंतर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
एका टास्कमध्ये तन्वीने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे दिव्या संतापली. तिचा राग इतका अनावर झाला की तिनं थेट तलवार चालवण्याची धमकी दिली. दिव्या म्हणाली, "मी या घराबाहेर सरकार म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल."
advertisement
हा प्रकार पाहून घरातील सदस्यही घाबरले.  या वक्तव्यानंतर बिग बॉसनं तिला स्वतःची चूक सुधारण्याची संधी दिली होती. मात्र दिव्यानं माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर बिग बॉसनं कडक पाऊल उचलत तिला घरातून बाहेर काढलं.
advertisement
advertisement
घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदे पहिल्यांदाच सोशल मीडियावर समोर आली आहे. तिनं एक व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांचे आभार मानले. व्हिडीओमध्ये ती म्हणाली, "नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला जे आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिला त्यासाठी मी नेहमीच ऋणी राहिन. लवकरच येतेय तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झालाय. जय भीम, जय शिवराय."
advertisement
दिव्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बिग बॉस किंवा घरातील कोणत्याही सदस्याचा थेट उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तिचा इशारा नेमका कोणासाठी होता याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. विषय संपला नाही, सुरू झालाय या वाक्यामुळे आता ती कोणता खुलासा करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दिव्या शिंदे घराबाहेर आल्यानंतर नेमकं काय बोलणार, कोणते खुलासे करणार हे येत्या काळात पाहायला मिळेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
विषय संपला नाहीये..! तलवारीच्या धमकीनंतर बिग बॉसमधून हकालपट्टी, दिव्या शिंदेचा पहिला VIDEO समोर
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement