25 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार या 10 जबरदस्त फिल्म, बॉक्स ऑफिसवर होणार महा क्लॅश
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
25 December Theater Releases Movies : 25 डिसेंबर 2025 फिल्मलवर्ससाठी खास ठरणार आहे. कारण क्रिसमसच्या निमित्ताने थिएटरमध्ये 10 फिल्म सीरिज होणार आहेत.
तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी (Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri) : कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा बहुचर्चित 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा येत्या 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना प्रेम, रोमान्स आणि नात्यांमधील चढ-उतार पाहायला मिळेल. समीर विद्धांस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
वृषभ (Vrushabha) : 'वृषभ' ही एका शक्तिशाली आणि श्रीमंत व्यावसायिकाची कथा आहे. ज्याचा मुलगा त्याचा रक्षक आहे. मात्र, मुलगा आपल्या पिढीजात गावी गेल्यावर त्या व्यावसायिकाला आपल्या मागील जन्माशी संबंधित अनेक स्वप्ने पडू लागतात. या स्वप्नांत तो स्वतःला एक हिंसक आणि बलाढ्य राजा म्हणून पाहतो, ज्याचा सर्वात मोठा शत्रू एक तरुण शासक आहे. जो अगदी त्याच्या स्वतःच्या मुलासारखा दिसतो.
advertisement
advertisement
advertisement
चॅम्पियन (Champion) : 'चॅम्पियन' ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील कथा आहे, ज्या काळात सामान्य लोक रजाकार राजवटीखाली संघर्ष करत होते. या काळात मायकेल सी. विल्यम्स नावाचा एक उत्कृष्ट फुटबॉलपटू साम्राज्यवादी शक्तींना आव्हान देतो. जसजशी त्या काळातील कटू वास्तव त्याच्या लक्षात येतात, तसतसा मायकेल आपल्या फुटबॉल कौशल्यांचा वापर करून अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध उभा राहण्याचा निर्णय घेतो.
advertisement
ईशा (Isha) : 'ईशा' या फिल्ममध्ये चार बालमित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. जे भूत-प्रेत आणि अंधश्रद्धांच्या अस्तित्वाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा शोध त्यांना एका भुताटकी, ओसाड गावात आणि एका रहस्यमय जुन्या घरापर्यंत घेऊन जातो, जिथे त्यांना भयावह आणि न समजणाऱ्या अलौकिक घटनांचा सामना करावा लागतो.
advertisement
शंभला (Shambhala) : 'शंभला' ही फिल्म 1980 च्या दशकातील एका अंधश्रद्धाळू गावावर आधारित आहे. जिथे एक रहस्यमय उल्कापिंड कोसळतो. त्यामुळे अलौकिक शक्ती आणि गावकऱ्यांच्या विचित्र वागणुकीला सुरुवात होते. रहस्य अधिक गूढ होत असताना, एक नास्तिक व्यक्ती त्या उल्कापिंडामागील आणि त्याचा गावावर होणाऱ्या परिणामामागील सत्य शोधण्याचा निर्धार करते.
advertisement
advertisement
मार्क (Mark) : 'मार्क' ही अजय मार्कंडेय या निलंबित पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे. तो आपल्या कठोर स्वभावासाठी आणि अढळ निर्धारासाठी ओळखला जातो. पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर, न्याय प्रस्थापित करण्यासाठी तो गुंड आणि भ्रष्ट राजकारण्यांच्या एका शक्तिशाली टोळीशी दोन हात करतो. ही फिल्म या प्रवासात त्याला येणाऱ्या आव्हानांचे चित्रण करते.
advertisement







