मोठी बातमी! आता ट्रेनच्या दारात लटकून प्रवास करणे होणार बंद; रेल्वेचा 'हा' महत्त्वाचा प्रयोग सुरू

Last Updated:

Changes In Local Train Door Design : मुंब्रा-दिवा दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने लोकल डब्यांच्या रचनेत बदल सुरू केले आहेत. दरवाजाजवळील पन्हाळीचा आकार बदलल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढणार असून अपघातांचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.

News18
News18
मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांच्या प्रवासाचे मुख्य साधन हे लोकल ट्रेन आहे. दररोज लाखोच्या संख्येने नागरिकयातून प्रवास करत असतात. मात्र गेल्या काही वर्षात याने प्रवास करणाऱ्यांच्या संख्ये वाढ होऊन अनेक अपघातही घडत आहेत. दरम्यान काही महिन्यापूर्वी घडलेल्या एका अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीर आला असून लोकल ट्रेनच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा-दिवा रेल्वे मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.या दुर्घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवालातील सूचनांची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकल डब्यांमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या पन्हाळीच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत.
लोकल प्रवाशांच्या अपघाताचे कारण काय?
9 जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय समितीची स्थापना करून सखोल चौकशी केली. या अहवालात लोकल गाड्यांचे दरवाजे कायम उघडे असतात आणि गर्दीमुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून किंवा दरवाजाजवळील पन्हाळीला धरून प्रवास करतात यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते.
advertisement
लोकल ट्रेनच्या दरवाजात करण्यात आला बदल
या सर्व गोष्टींचा विचार करता समितीने तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या. त्यानुसार सध्या कुर्ला कारशेडमध्ये काही लोकल डब्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. दरवाजालगत असलेली पन्हाळी आता नव्या डिझाइनमध्ये तयार करण्यात येत असून तिचा आकार धनुष्यबाणासारखा उंचावण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना ती पकडून लटकणे शक्य होणार नाही.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हे बदल यशस्वी ठरल्यास भविष्यात सर्व लोकल डब्यांमध्ये ही सुधारणा करण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! आता ट्रेनच्या दारात लटकून प्रवास करणे होणार बंद; रेल्वेचा 'हा' महत्त्वाचा प्रयोग सुरू
Next Article
advertisement
BMC Election: आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, युती-आघाडीचा घोळ सुटणार?
आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, युती
  • आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, युती-आघाडीचा

  • आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, युती-आघाडीचा

  • आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, युती-आघाडीचा

View All
advertisement