New Year Vastu Tips: नवीन वर्षात प्रगतीत पुढचं पाऊल पडणार? पण घरात या गोष्टी त्यासाठी तयार हव्यात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
New Year Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या लहान गोष्टीही आपल्या मनावर, आरोग्यावर आणि नशिबावर परिणाम करतात. नवीन वर्षापूर्वी घरात काही लहान वास्तु बदल केल्यास येणारे वर्ष सुख आणि समतोल घेऊन येऊ शकते, याविषयी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रज्ञ अंशुल त्रिपाठी सांगत आहेत.
मुंबई : नवीन वर्ष चांगलं असावं, त्यात काहीतरी लाभाच्या गोष्टी व्हाव्यात, जीवनात काही खुशखबर मिळावी, अशी सर्वसाधारणपणे सगळ्यांची इच्छा असते. पण फक्त इच्छा ठेवून पर्याय नाही, त्यासाठी आपण स्वत: काही प्रयत्न करायला हवेत. बरेच लोक नवीन वर्षाला घराची स्वच्छता करतात, जुन्या वस्तू काढतात, पण हे बदल जर वास्तुशास्त्रानुसार केले तर त्याचा परिणाम अधिक चांगला होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या लहान गोष्टीही आपल्या मनावर, आरोग्यावर आणि नशिबावर परिणाम करतात. नवीन वर्षापूर्वी घरात काही लहान वास्तु बदल केल्यास येणारे वर्ष सुख आणि समतोल घेऊन येऊ शकते, याविषयी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रज्ञ अंशुल त्रिपाठी सांगत आहेत.
घराच्या दारात - वास्तुशास्त्रानुसार घराचा दारातूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. नवीन वर्षापूर्वी घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ-सुंदर आणि मोकळे असणे आवश्यक आहे. दरवाजासमोर जोडे-चप्पल, तुटलेले सामान किंवा कचरा ठेवू नका. दरवाजावर चांगला प्रकाश असावा. संध्याकाळच्या वेळी दिवा लावणे शुभ मानले जाते. हा छोटासा बदल घरात सुख-शांती वाढवण्यास मदत करतो.
advertisement
आपल्या घरात असलेले तुटलेले फर्निचर, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, फाटलेले पडदे किंवा वापरात नसलेल्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. अशा वस्तू साठवून ठेवल्याने जीवनात अडचणी येतात. म्हणून नवीन वर्षापूर्वी घर स्वच्छ करा. जे सामान कामाचे नाही ते दान करा किंवा काढून टाका. यामुळे घरात नवीन उर्जेसाठी जागा तयार होते आणि मनही हलके वाटते.
advertisement
स्वयंपाकघरात करा हा सोपा बदल - स्वयंपाकघर हे घराचे आरोग्य आणि समृद्धीशी जोडलेले असते. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये स्वच्छता आणि योग्य मांडणी खूप महत्त्वाची असते. गॅस शेगडीजवळ घाण ठेवू नका आणि दररोज किचनची स्वच्छता करा. बिनकामी किंवा तुटलेली भांडी किचनमध्ये ठेवू नका. जर किचनमध्ये सिंक आणि शेगडी खूप जवळ असतील, तर त्यांच्यामध्ये लाकडी बोर्ड किंवा थोडे अंतर ठेवा. हा बदल घरातील तणाव कमी करण्यास मदत करतो.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशा अत्यंत शुभ मानल्या जातात. या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा घरात येते. या दिशांना कचरा, जड फर्निचर किंवा अंधार नसावा. इथे प्रकाश आणि स्वच्छता ठेवा. हवं असल्यास इथे एखादे छोटे रोप किंवा शोभेची वस्तू ठेवू शकता. हा बदल घराचे वातावरण चांगले करतो.
advertisement
वास्तूत पाण्याचा संबंध भावना आणि संपत्तीशी जोडला जातो. घरात गळणारे नळ, खराब टाकी किंवा साचलेले घाण पाणी नकारात्मक परिणाम करू शकते. नवीन वर्षापूर्वी सर्व नळ आणि पाण्याची व्यवस्था ठीक करून घ्या. स्वच्छ पाणी आणि योग्य दिशेला असलेला पाण्याचा स्रोत घरात समतोल राखतो. पूजा घरात खराब मूर्ती, तुटले-फाटलेले फोटो किंवा जळालेले दिवे ठेवू नका. पूजेची जागा रोज स्वच्छ करा आणि तिथे हलका सुगंध किंवा अगरबत्ती लावा. ते मानसिक शांततेसाठीही खूप चांगले मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 8:29 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
New Year Vastu Tips: नवीन वर्षात प्रगतीत पुढचं पाऊल पडणार? पण घरात या गोष्टी त्यासाठी तयार हव्यात








