Guru Peeda : नवीन वर्ष 2026 सुरू होताच गुरुपीडा, या 3 राशींवर होणार परिणाम, हे करा उपाय Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीवरून वर्षाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार योग्य तयारी करता येते. येणाऱ्या 2026 या वर्षात तीन राशींना गुरुपीडेला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई: नवीन वर्ष सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असणार, कोणत्या राशीसाठी अनुकूल तर कोणत्या राशीसाठी थोडं आव्हानात्मक असणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीवरून वर्षाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार योग्य तयारी करता येते. येणाऱ्या 2026 या वर्षात तीन राशींना गुरुपीडेला सामोरे जावे लागणार आहे. ही माहिती दाते पंचांगानुसार देण्यात आली असून याबाबत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.
गुरुचा कर्क राशीत प्रवेश
1 जून 2026 रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर गुरुची दृष्टी चार, आठ आणि बारा या स्थानांवर पडते. या स्थितीत गुरुची दृष्टी काही राशींसाठी घातक मानली जाते आणि त्यामुळे गुरुपीडा निर्माण होते.
advertisement
कोणत्या राशींना गुरुपीडा भोगावी लागणार?
दाते पंचांगानुसार,
मेष, सिंह आणि धनु या तीन राशींना 2026 मध्ये गुरुपीडेला सामोरे जावे लागणार आहे.
या काळात या राशींच्या लोकांना आर्थिक अडचणी, कामाच्या ठिकाणी ताणतणाव, आरोग्याशी संबंधित त्रास, मानसिक अस्वस्थता, यांचा सामना करावा लागू शकतो.
गुरुपीडेवर उपाय काय?
गुरुपीडेचा प्रभाव कमी करण्यासाठी काही निश्चित उपाय सांगितले आहेत.
advertisement
दर गुरुवारी बृहस्पती मंत्राचा जप करावा. गुरुवारी दानधर्म करावा. 1 जून 2026 रोजी दत्त मंदिरात जाऊन गुळाची ढेप, साखर, पिवळे फूल, केळी अर्पण करावे.
हे उपाय केल्याने गुरुपीडेचा त्रास कमी होतो.
गुरु 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कर्क राशीत राहणार आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहबदलानंतर वृषभ, कन्या आणि मकर या राशींनाही गुरुपीडेचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे या राशींच्या लोकांनीही गुरु उपासना आणि दान करणे आवश्यक आहे.
advertisement
नवीन वर्षासाठी काय करावं?
2026 हे वर्ष काही राशींसाठी संयमाचं आणि श्रद्धेचं असणार आहे. गुरुपीडा असली तरी योग्य उपासना, जप आणि दान केल्यास तिचा परिणाम कमी करता येतो. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच योग्य धार्मिक आणि मानसिक तयारी करणं महत्त्वाचं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 10:00 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Guru Peeda : नवीन वर्ष 2026 सुरू होताच गुरुपीडा, या 3 राशींवर होणार परिणाम, हे करा उपाय Video








