TRENDING:

Toll Update: आजपासून टोल महागला! पुण्यातून बाहेर जाणाऱ्या या 3 महत्त्वाच्या महामार्गांवर दरवाढ; पाहा नवे दर

Last Updated:

पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी नवीन टोल दरामध्ये काही रुपयांची वाढ करण्यात आली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: तुम्ही आज (१ एप्रिल) पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर किंवा पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवासाचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दरात सरासरी ५ टक्क्यांची वाढ केली आहे. आजपासून या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासोबतच आता टोलनाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून 'कॅशलेस' वसुलीवर अधिक कडक भर दिला जाणार आहे.
पुण्यातून बाहेर जाणाऱ्या या 3 महत्त्वाच्या महामार्गांवर दरवाढ (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यातून बाहेर जाणाऱ्या या 3 महत्त्वाच्या महामार्गांवर दरवाढ (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नवे दर आणि खिशावर पडणारा भार

पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी नवीन टोल दरामध्ये काही रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कार, जीप आणि हलक्या वाहनांपासून ते अवजड ट्रकपर्यंत सर्वांसाठीच टोलचे दर वाढले आहेत. सुधारित दरांनुसार, कार किंवा जीपसाठी आता एकेरी प्रवासाला ९५ रुपये तर परतीच्या प्रवासासाठी १३० रुपये मोजावे लागणार आहेत.

advertisement

हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी हा दर १५० रुपये (एकेरी) आणि २१० रुपये (परतीचा) असा झाला आहे. बस आणि ट्रकसाठी आता ३१५ रुपये मोजावे लागतील, तर मोठ्या अवजड वाहनांसाठी हा आकडा ५४५ ते ८१५ रुपयांच्या घरात गेला आहे.

कॅशलेस सक्ती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

टोल नाक्यांवरील व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी 'कॅशलेस' पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कडक दंडाची तरतूद आहे. फास्टॅग (FASTag) वैध नसेल तर वाहनचालकाला संबंधित टोलच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. तसंच जर तुम्ही फास्टॅगऐवजी यूपीआयद्वारे पेमेंट केले, तर एकूण टोलच्या सव्वापट रक्कम (१.२५ पट) आकारली जाईल. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स आहे का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवासाच्या आनंदापेक्षा दंडाचा मनस्तापच अधिक सहन करावा लागेल.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Toll Update: आजपासून टोल महागला! पुण्यातून बाहेर जाणाऱ्या या 3 महत्त्वाच्या महामार्गांवर दरवाढ; पाहा नवे दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल