2005 ची पुण्यातील बातमी...
तुकाराम मुंडे यांनी ट्विटर हँडलवर एक पेपरची बातमी शेअर केली. ही 2005 ची पुण्यातील बातमी होती. ही बातमी वाचताच तुकाराम मुंडे यांचं मन भरून आलं. कारण ही बातमी होती तुकाराम मुंडे यांच्या अधिकारी झाल्याच्या यशाची... तुकाराम मुंडे यांचा युपीएससी परीक्षेत 20 वा क्रमांक आला होता. 25 मे 2005 सालची ही बातमी होती. त्यावेळी ते पीएचडी करत होते. 'आठवणींची ओढ' या कॅप्टनखाली त्यांनी तो पेपरचा तुकडा शेअर केला.
advertisement
आठवणी मी आयुष्यभर जपून ठेवेन
तुकाराम मुंडे यांनी शेअर केलेल्या पेपरमध्ये चार अधिकाऱ्यांची नावं आहेत. तुकाराम मुंडे, आरिफ शेख, नितीन वाघमोडे आणि शारदा निकम अशी नावं यामध्ये दिसतात. अशा सुंदर क्षणांची मी जपणूक करून ठेवली नव्हती. मित्रमंडळी आणि शुभेच्छुकांनी हे क्षण शेअर केले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या आठवणी मी आयुष्यभर जपून ठेवेन, असं तुकाराम मुंडे म्हणाले.
पेपरच्या आर्टिकलमध्ये काय लिहिलंय?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मूळचा बीड जिल्ह्यातील ताडसोना या गावचा तुकाराम हरिभाऊ मुंढे हा भारतात 20 व्या क्रमांकाने, तर राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याने राज्यशास्त्रात एम. ए. केले असून सध्या तो 'भारताचे आण्विक धोरण' या विषयावर डॉ. शांतिश्री पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. करीत आहे. आरिफ शेख हा भारतात 94 वा आला आहे. त्याने बी. ई. पदवी संपादन केली असून, एचसीएल कंपनीत दोन वर्षे उपग्रह दळणवळण अभियंता म्हणून काम केले आहे. नितीन वाघमोडे व शारदा निकम यांनीही या परीक्षेत यश मिळवले आहे.
