निखील खाडे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदचा रहिवासी आहे. निखीलने शेअर बाजारात पैसे लावले होते, तसंच त्याने काही लोकांकडून उधारीवरही पैसे घेतले. जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही आणि पैशांची गरज वाढली, तेव्हा त्याने चोरी करायला सुरूवात केली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
बेरोजगारीमुळे झाला चोर
एका पीजीमधून मोबाईल आणि लॅपटॉप चोरी झाल्याप्रकरणी निखील आरोपी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, यानंतर पोलिसांनी हिंजवडीच्या साखरे चौक भागातून निखीलला अटक केली. तपास केल्यानंतर निखीलकडून चोरीचा एक मोबाईल फोन जप्त केला. तसंच आतापर्यंत 10 मोबाईल आणि 2 लॅपटॉप चोरी केल्याचं निखीलने कबूल केलं आहे.
advertisement
पोलिसांनी आरोपीकडून चोरीचं सामान जप्त केलं आहे, तसंच पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या टीमने या प्रकरणाचा तपास केला. या घटनेनंतर पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा समोर आला आहे.