TRENDING:

Pune Murder: आयुषच्या हत्येच्या दिवशी बंडू आंदेकर कुठे होता? कोर्टात आलं सत्य समोर, मोठी खळबळ

Last Updated:

Pune Ayush Komkar Murder: माझ्या नातवाचा खून करून मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? असे म्हणत बंडू आंदेकरने कोर्टात सर्व आरोप फेटाळले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
bandu andekar
bandu andekar
advertisement

पुणे : पुण्यातील टोळी युद्धाने संपूर्ण राज्याला हादरवले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदकर टोळीने आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली. पुण्याच्या नाना पेठ येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये कोमकर कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आयुष कोमकरवर दोघांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी मुख्य आरोपी बंडू आंदेकरांसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत बंडू आंदेकरने मुलीने केलेले सर्व आरोप फेटाळले असून आम्हाला खोट गुंतवलं आहे आम्ही केरळला होतो, असा दावा केला आहे.

advertisement

आयुष कोमकर हत्या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली. आयुष्य कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह सहा जणांना 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु हे सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

माझ्या नातवाचा खून करून मला काय मिळणार?  बंड आंदेकर

advertisement

बंडू आंदेकरचे वकील कोर्टात म्हणाले, आम्ही गेल्या 10 तासांपासून अटकेत आहे. माझ्या विरोधात जो गुन्हा झाला तो चुकीची आहे . कल्याणी माझी मुलगी आहे जिने फिर्याद दिली. ज्याची हत्या झाली तो नातू आहे. गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता, त्यात मी फिर्यादी आहे . मी त्यावेळी सांगितलं होतं की कल्याणी ने देखील कट रचला होता . तिच्या घरचे यात अटक झाले आहेत. माझ्या नातवाता खून करून मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का?

advertisement

आमचे घरगुती वाद  म्हणून माझं नाव घेतलं :  बंडू आंदेकरचे वकील

वनराजचे खूप फॉलोअर्स तो लोकप्रिय होता,आहेत त्यापैकी कुणी मारलं असेल त्याचे खूप फॅन आहेत. मी फिर्यादीत कल्याणाीच्याा नवऱ्याचे नाव घेतले आहे म्हणून माझ नाव यात गोवल गेल आहे. माझ संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे हेच यामागचा उद्देश आहे कारण माझ्या मुलाच्या खुनाप्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलं आहे. दत्ता काळे याने माझ नाव घेतलं नाही . आम्हाला खोटा फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवले जात आहे. आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं आहे. आम्ही राज्यात नव्हतो , आम्ही केरळमध्ये होतो. आम्ही कट रचण्याचा प्रश्नच येत नाही, असे बंडू आंदेकरचे वकील म्हणाले.

advertisement

हे ही वाचा :

 'Love You पप्पा, नवीन ड्रेस पाठवलाय', आयुषची 'ती' भेट छातीला लावून बाप स्मशानात ढसाढसा रडला

मराठी बातम्या/पुणे/
Pune Murder: आयुषच्या हत्येच्या दिवशी बंडू आंदेकर कुठे होता? कोर्टात आलं सत्य समोर, मोठी खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल