Pune Murder: 'Love You पप्पा, नवीन ड्रेस पाठवलाय', आयुषची 'ती' भेट छातीला लावून बाप स्मशानात ढसाढसा रडला
- Published by:Prachi Amale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
वडिलांच्या प्रेमासाठी आतुर झालेल्या आयुषची जेलमधील ती भेट अखेरची ठरली.
पुणे : पुण्यातील नानापेठ परिसरात आंदेकर आणि कोमकर यांच्या वादात आजोबाने लेकाचा बदला घेण्यासाठी नातवाचा जीव घेतला. आंदेकरच्या टोळीने वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली.अखेर तीन दिवसानी आज आयुषवर पुण्याच्या वैकुंठ स्मशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता. पॅरोलवर सुटलेले वडील गणेश कोमकर अखेर आपल्या लेकराच्या अखेरच्या प्रवासाला सामील झाले. या अंत्यसंस्कारावेळी वातावरण शोकाकुल झाले होते. वनराज आंदेकर हत्या प्रकरणी गणेश कोमकर वर्षांपासून नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. आज गणेशवर स्वतःच्या लेकरावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यावेळी गणेशच्या हातातील एक भेटकार्ड हे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
advertisement
"पप्पा नवीन ड्रेस पाठवलाय"
अंत्यसंस्कारासाठी आलेल्या गणेशच्या हातात एक भेटकार्ड होतं. हे साधं भेटकार्ड नव्हतं, तर त्यांचा लेक आयुषनं स्वतः कारागृहात वडिलांना पाठवलेलं होतं. "आय लव्ह यू पप्पा" असं त्या कार्डावर आयुषनं लिहिलं होतं. त्याचबरोबर "नवीन ड्रेस पाठवलाय" असे देखील लिहिले होते. या कार्डासोबत त्याने काही बालपणीचे फोटो चिकटवले होते. वडिलांच्या प्रेमासाठी आतुर झालेल्या मुलाची ती अखेरची भेट ठरली.
advertisement
लेकासोबत ती ठरली अखेरची भेट
लेकाने अखेरच्या भेटीत दिलेले हेच कार्ड गणेशने आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयाशी घट्ट धरून ठेवलं होतं. गणेशने लेकाची हे शेवटची आठवण म्हणून सर्वांसमोर दाखवली. तुझी शेवटची भेट मी जपून ठेवली आहे, मुलाला सांगण्यासाठी कदाचित तो गणेश भेटकार्ड घेऊन आला होता. बालपणापासूनचे दोघांचे एकत्रित फोटो त्या कार्डात पाहून उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी हळहळले. कारागृहात असतानाही मुलाने पाठवलेलं प्रेमाचं प्रतीक आज वडिलांच्या हातात होतं, पण मुलगा मात्र नव्हता. वनराजच्या खुनानंतर आंदेकर-कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदेकर-कोमकर संघर्षात एका निरागस जीवाचा बळी घेतला आहे.
advertisement
सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद
पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेल्या वनराज आंदेकरांच्या या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला. वनराज आंदेकर यांचं त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत बिनसलं होतं. गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे. मागील तीन पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिलंय. गेली पाच दशकं बाहेर खेळलं जात असलेलं टोळीयुद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरु झालं आणि सख्ख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली.त्यानंतर आता आंदेकर टोळीने सख्ख्या भाच्याचा खून केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 08, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Murder: 'Love You पप्पा, नवीन ड्रेस पाठवलाय', आयुषची 'ती' भेट छातीला लावून बाप स्मशानात ढसाढसा रडला