पोलीस स्टेशनमध्येच केला जावयाचा मर्डर, निर्दयी बापाने मुलीचं कुंकू पुसलं, अख्ख्या शहरात खळबळ

Last Updated:
सासऱ्याने पोलीस स्टेशनमध्येच जावयाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पोलिसांचा धाक आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
1/5
पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच आरोपी सासऱ्याने त्याच्या जावयावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. अमरोली पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

advertisement
2/5
सागर याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं, पण या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. लग्नानंतर सागरची पत्नी प्रेग्नंट राहिली, पण मुलीचे वडील देविदास काढरे यांनी मुलीवर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला.

3/5
हा वाद मिटवण्यासाठी सागर आणि त्याच्या पत्नीचे वडील अमरोली पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस अधिकारी सागर आणि त्याच्या सासऱ्यांना समजावत होते, पण बोलणी सुरू असतानाच देविदासने त्याच्याकडे असलेला चाकू बाहेर काढला आणि सागरवर हल्ला केला.

4/5
देविदासने पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच सागरचा चाकूने गळा चिरला, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये रक्ताचे पाट वाहिले. या हल्ल्यानंतर सागर जागीच कोसळला, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण हल्ला इतका गंभीर होता की यात त्याचा मृत्यू झाला.

5/5
पोलीस स्टेशनमध्ये अशाप्रकारे हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती तसंच संतापाची लाट उसळली आहे. डायमंड सिटी म्हणून जगात ओळख मिळवलेल्या सुरतमध्ये अशाप्रकारे गुन्हे घडत असतील तर नागरिकांच्या सार्वजनिक सुरेक्षेचं काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी देविदास याला अटक केली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement