Asia Cup 2025 : आशिया कपआधीच संजू सॅमसनची मोठी घोषणा,कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं, सर्वस्तरातून कौतुक
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
उद्या 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सूरूवात होणार आहे.या स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनने मोठी घोषणा केली आहे.त्याच्या या घोषणेची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे
Sanju Samson News : उद्या 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सूरूवात होणार आहे.या स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनने मोठी घोषणा केली आहे.त्याच्या या घोषणेची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.तर त्याच्या या कृतीच क्रिकेट वर्तुळात कौतुक देखील होतेय.त्यामु्ळे आशिया कपआधी त्याने नेमकी काय घोषणा केली आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर संजू सॅमसन सध्या आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यासाठी तो मैदानात कसून सराव करतोय. या सरावा दरम्यान संजू सॅमसनने मोठी घोषणा केली आहे. संजू सॅमसन त्याच्या केरला क्रिकेट लीगमधील कोची ब्लू टायगर्स संघाला लिलावात मिळालेले पैसे भेट म्हणून दिले आहेत. संजू सॅमसन या लीगमधला सर्वांत महागडा खेळाडू होता. त्याला कोची ब्लू टायगर्स संघाने 26.60 कोटी रूपयांना खरेदी केले होते.आता हीच रक्कम त्याने आपल्या संघातील खेळाडूंना आणि कोंचिग स्टाफला भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे संजू सॅमसन चं कौतुक होत आहे.
advertisement
Sanju Samson has confirmed that the auction money he received will be gifted to players & coaches of Kochi Blue Tigers after the KCL victory. ❤️
- Sanju is winning the heart of everyone. pic.twitter.com/e91KtIxwez
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2025
advertisement
दरम्यान यंदाच्या हंगामात कोची ब्लू टायगर्सनी 75 धावांनी अरीस कोलम सेलर या संघाचा पराभूत करत केसीएलची ट्रॉफी जिंकली होती. या विजयासह कोची ब्लू टायगर्सला 30 लाखाची बक्षीस रक्कम मिळाली होती.त्यानंतर आता संजू सॅमसनने लिलावात मिळालेले 26.60 कोटी खेळाडूंना आणि कोचिंग स्टाफला दिले आहेत.त्यामुळे सॅमसनच्या निर्णयाचे आता कौतुक होत आहे.
advertisement
संजूच स्थान धोक्यात?
दरम्यान आशिया कपमध्ये संजू सॅमसनच स्थान धोक्यात आलं आहे. कारण सलामीवीर म्हणून शुभमन गिलचाही विचार सूरू आहे.अशापरिस्थितीत एक तर संजू संघातून बाहेर होऊ शकतो किंवा त्याला सलामी सोडून दुसऱ्या कोणत्या स्थानी खेळावं लागण्याची शक्यता आहे. पण आता भारताच्या माजी मुख्य कोचने संजूची पाठराखण केली आहे.
संजू सॅमसन हा पहिल्या तीन खेळाडूंपैकी सर्वांत खतरनाक खेळाडू आहे. तो तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो.त्यामुळे त्याला त्याचाच स्थानी खेळवा असे रवी शास्त्री यांनी सांगितले आहे. संजूच्या जागी शुभमन गिलला आणण तितकंस सोप्प नाही आहे. गिललाही हटवणे सोप्पे नाही आहे.गिल कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास येऊ शकतो ,त्यामुळे सॅमसनसाठी सलामीवीराचे स्थान सोडलं पाहिजे असे रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.त्यामुळे आता गौतम गंभीर आणि अजित आगरकर हे दोन्ही सिनिअर्स आता रवी शास्त्रींचा सल्ला ऐकतात की संजूला बाहेर बसवतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 7:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : आशिया कपआधीच संजू सॅमसनची मोठी घोषणा,कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं, सर्वस्तरातून कौतुक