TRENDING:

Pune : पुण्याची तरुणी अन् अहमदनगरचा तरुण; वाघोलीत लॉजवर एकत्रच संपवलं जीवन

Last Updated:

पुण्यातील २० वर्षी मुलीचे मूळचा अहमदनगरच्या असलेल्या २१ वर्षी मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, पुुणे, 31 ऑक्टोबर :  वाघोलीतील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आलीय. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील २० वर्षी मुलीचे मूळचा अहमदनगरच्या असलेल्या २१ वर्षी मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. मात्र वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्याने लॉजमधील कामगारांनी तरुणाच्या मोबाईलवर संपर्क साधला.

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलन पेटले, शहरात संचारबंदी; इंटरनेट सेवाही बंद

advertisement

तरुणाने फोन न उचलल्याने कामगार खोलीजवळ गेले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा दरवाजा बंद नसल्याचं लक्षात आलं. दरवाजा ढकलल्यानंतर आत दोघांनीही गळफास घेतल्याचं दिसलं. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

तरुणी डीएमएलटीचं शिक्षण घेत होती. तर तरुण खासगी कंपनीत नोकरी करत होता. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. अधिक तपास लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्याची तरुणी अन् अहमदनगरचा तरुण; वाघोलीत लॉजवर एकत्रच संपवलं जीवन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल