मुंबईनंतर कार्यालयांच्या भाड्याच्या बाबतीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर हैदराबाद, चौथ्या क्रमांकावर बंगळुरू, पाचव्या क्रमांकावर पुणे तर सहाव्या क्रमांकावर चेन्नई हे शहर आहे. या सर्वेक्षणानुसार, 2012 मध्ये मुंबईतील ऑफिस भाड्याचे सरासरी दर प्रति चौरस फूट 131 रुपये होते. 2025मध्ये हे दर प्रति चौरस फूट 168 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कोरोना महामारीनंतर पुन्हा कंपन्यांनी ऑफिसमधून काम करण्यास प्राधान्य दिल्यामुळे ऑफिसच्या भाड्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
Thane News: ‘नो एन्ट्री’चा निर्णय रद्द, पावसामुळे घोडबंदर मार्ग अवजड वाहनांसाठी पुन्हा खुला!
मुंबईमध्ये कंपन्या प्रामुख्याने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ, अंधेरी पूर्व यांसारख्या विकसित परिसरांना पसंती देत आहेत. या परिसरांमध्ये वित्तीय सेवा संस्था, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, माध्यम कंपन्या, मनोरंजन कंपन्या, वाहन कंपन्यांचे ऑफिस आहेत.
बॉलिवुड कलाकारांची गुंतवणूक वाढली
बॉलिवुड कलाकार मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अथवा कार्यालयीन मालमत्तांची खरेदी करत आहेत. गेल्या दोन वर्षांत कलाकारांनी मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 60 टक्के गुंतवणूक ही कार्यालयीन मालमत्तेमध्ये केली आहे. या कलाकारांनी आपल्या मालमत्ता खासगी कंपन्यांना भाड्याने दिल्या आहेत.