Thane News: ‘नो एन्ट्री’चा निर्णय रद्द, पावसामुळे घोडबंदर मार्ग अवजड वाहनांसाठी पुन्हा खुला!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane News: घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांना नो एन्ट्रीचा निर्णय मागे घेण्यात आला असून रस्ता वाहतुकीस पुन्हा खुला करण्यात आला आहे.
ठाणे : ठाणे ते घोडबंदर रोड गायमुख घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सुट्ट्यांच्या काळात गायमुख घाट रस्ता दुरुस्तीचे काम पावसामुळे रद्द करावे लागले आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांसाठी घेतलेला नो एन्ट्रीचा निर्णय ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी मागे घेतला आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेने गायमुख घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून हाती घेतले होते. 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या काळात हे काम पूर्ण करण्याचे नियोजित होते. परंतु, शुक्रवारी पहाटेच जोरदार पाऊस झाल्याने हे काम रद्द करावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा अवजड वाहनांसाठी हा रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रस्ता दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे.
advertisement
घोडबंदर मार्गावर होणाऱ्या डांबरीकरणाच्या कामामुळे ऐन सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये वाहतुकीला फटका बसणार होता. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या मार्गावरून होणारी वाहतूक बंद राहणार होती. भरीस भर दहीहंडीच्या निमित्ताने ठाणे शहर पोलिसांनी शनिवारी अनेक ठिकाणी वाहतूक मार्गामध्ये बदल केले होते. त्यामुळे गोविंदा पथकांच्या बस आणि ट्रक घोडबंदर मार्गावरच उभे केले होते.
advertisement
गायमुख घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी ठाणे पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा रस्ता बंद केला होता. ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. परंतु, पावसाच्या पाण्यामुळे तूर्तास रस्त्याचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे 15 ते 18 ऑगस्टदरम्यान या मार्गावरील वाहतूक पूर्ववत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 16, 2025 9:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane News: ‘नो एन्ट्री’चा निर्णय रद्द, पावसामुळे घोडबंदर मार्ग अवजड वाहनांसाठी पुन्हा खुला!