Mumbai Red Alert: दहीहंडी दिवशी अस्मानी संकट! मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पाऊस, IMD कडून रेड अलर्ट!
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.
आज, 16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडीचा जल्लोष साजरा होत आहे. मुंबई आणि कोकणातही उत्साहाची लाट असली तरी या सोहळ्यावर अस्मानी संकटाचं विघ्न येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिले असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम असून, आजही अनेक ठिकाणी पावसाचा प्रभाव जाणवणार आहे.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरांना आज रेड अलर्ट जारी केला आहे. दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, कमाल तापमान 28°C असेल. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमीपर्यंत जाऊ शकतो. उच्च भरतीमुळे समुद्रकिनारी जाणे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच दहीहंडी बघायला जाण्यापूर्वी पावसाची स्थिती पाहावी लागेल.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही भागांना आज ऑरेंज अलर्ट आहे. दिवसात सतत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 27°C आणि किमान 24°C राहील, वाऱ्याचा वेग 35-45 किमी प्रतितास पोहोचू शकतो. काही ठिकाणी पाणी साचण्याचा धोका असून त्याचा वाहतुकीवरही परिणाम होईल. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. रायगडला आज रेड अलर्ट असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे, तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट आहे. कमाल तापमान 27-28°C आणि किमान 24-25°C राहील. वाऱ्याचा वेग 30-50 किमी प्रतितास राहू शकतो. मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.









