शनीच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण
शनि महादशा, साडेसाती किंवा ढय्या यांसारख्या प्रभावांचा नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी हनुमान चालीसा पठण अत्यंत उपयुक्त मानले जाते. भगवान हनुमान यांना शनीदेवाच्या कोपापासून रक्षण करणारे शक्तिशाली देवता मानले जाते. त्यामुळे या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने शनीची कृपा लाभते आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर
हनुमान चालीसाचे पठण केल्याने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे परीक्षेत यश मिळवण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी सकाळी किंवा रात्री अभ्यास करण्यापूर्वी हनुमान चालीसा पठण केल्यास अभ्यासात सातत्य राहते आणि चांगले गुण मिळतात.
advertisement
मनःशांती आणि भीतीचा नाश
हनुमान चालीसा रोज पठण केल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच कोणत्याही प्रकारची अनामिक भीती किंवा नकारात्मक विचार दूर होतात. विशेषतः रात्री झोपण्याआधी हनुमान चालीसा म्हटल्यास वाईट स्वप्नं पडत नाहीत आणि झोप चांगली लागते.
रोग आणि संकटांपासून मुक्ती
हनुमान चालीसा हे आरोग्यासाठी देखील लाभदायक मानले जाते. नियमित पठण केल्याने मानसिक आणि शारीरिक तणाव दूर होतो. तसेच अनेक शारीरिक व्याधींवर याचा सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते.
कुटुंबात सुख-शांती आणि व्यवसायात प्रगती
घरात रोज हनुमान चालीसा पठण केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते. गृहकलह दूर होतात आणि कुटुंबामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते. तसेच नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठीही हे पठण फलदायी मानले जाते.
नकारात्मक ऊर्जेचा नाश आणि ग्रहशांती
हनुमान चालीसा पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच राहू-केतू आणि इतर ग्रहांचे अशुभ प्रभावही कमी होतात. हनुमानजींची कृपा राहिल्यास जीवनातील संकटे लवकर दूर होतात आणि यशाचा मार्ग सुकर होतो.
Shree Hanuman Chalisa: संपूर्ण हनुमान चालीसा- जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर
हनुमान चालीसाचे नियमित पठण केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आत्मिक शांती मिळते. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या स्तोत्राचे पठण केल्यास त्याचा चांगला लाभ होतो. संकटांचा नाश करून यश, समृद्धी आणि शांती मिळवण्यासाठी हनुमान चालीसा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे.