मोतिहारी येथे रुद्राक्षाचे शिवलिंग -
हे मंदिर बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आहे. मोतिहारी येथील उद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. शंभूनाथ सिकरिया यांनी मोतिहारी येथील राधा सिकारीया एज्युकेशन कॅम्पसमध्ये 5 लाख पंचमुखी रुद्राक्षांनी 20 फूट उंच शिवलिंग तयार केले आहे. या शिवलिंगाच्या वर भगवान शंकराचा सोन्याने मुलामा दिलेला मुखवटा आहे. ज्यावर माता गंगा विराजमान आहे.
advertisement
वटवृक्षाखाली या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या शिवलिंगाची स्थापना करण्याचा साक्षात्कार त्यांना स्वप्नात मिळाल्याचे डॉ. शंभूनाथ सिकारिया सांगतात. स्वप्नात मला जसा साक्षात्कार झाला, जशा सूचना मिळाल्या, त्यानुसार हे शिवलिंग साकारल्याचे त्यांनी सांगितले.
या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात
हरिद्वार, नेपाळ आणि बनारस येथून रुद्राक्ष मागवले -
हे अप्रतिम शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या निर्मितीसाठी हरिद्वार, नेपाळ आणि बनारस येथून विशेष प्रकारचे पंचमुखी रुद्राक्ष आणण्यात आले. असा दावा केला जात आहे की, जगात असे कोणतेही शिवलिंग नाही जे रुद्राक्षाचे आहे. हे पहिले शिवलिंग आहे जिथे द्वादश ज्योतिर्लिंग, एकादश रुद्राची स्थापना केली जाते. या शिवलिंग मंदिराची स्थापना त्यांच्या पूर्वजांनी 40 वर्षांपूर्वी केली होती, असे डॉ. सिकारिया सांगतात.
त्यांनी सांगितले की 1 जुलै 2022 रोजी काशीचे सुमेरू पीठाधीश्वर स्वामी नरेंद्रनंद सरस्वती यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. रुद्राक्षापासून बनवलेल्या या शिवलिंगाला एकदा जल अर्पण करणे किंवा रुद्राभिषेक केल्यास चार वेळा लखराव केल्याचे फळ मिळते, असा दावा डॉ.सिकरिया करतात.
डॉ.सिकरिया यांच्याकडून दररोज सकाळी 8 वाजल्यापासून मोफत रुद्राभिषेक केला जातो. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो. तर सायंकाळी शिवलिंगाची भव्य सजावट केली जाते.
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)