चंद्रग्रहण 2026: वेळ आणि सूतक काळ
हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, ग्रहणाची वेळ दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:47 पर्यंत असेल. तर सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी, म्हणजेच 3 मार्चच्या सकाळी 6:20 वाजल्यापासून सुरू होईल. ग्रहणामुळे यंदा होलिका दहन ग्रहण संपल्यानंतर, म्हणजेच संध्याकाळी 6:48 नंतरच करणे शास्त्रोक्त ठरेल.
advertisement
राहूचा प्रभाव घातक का असू शकतो?
चंद्रावर राहूचे सावट
राहू आणि केतू हे सावली ग्रह आहेत. जेव्हा चंद्रग्रहण होते, तेव्हा राहू चंद्राला ग्रासतो. यामुळे माणसाची विचार करण्याची शक्ती कमकुवत होते. संभ्रम, भीती आणि घाई यामुळे व्यक्ती चुकीचे पाऊल उचलू शकते. ज्योतिषांच्या मते, या काळात प्रत्येक व्यक्तीने विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे गरजेचे आहे.
होलाष्टकाचा शेवटचा दिवस
होलाष्टकाच्या 8 दिवसांत ग्रहांची स्थिती आधीच उग्र असते. शेवटच्या दिवशी राहूचा प्रभाव सर्वोच्च असतो. ज्या राशींच्या कुंडलीत राहू किंवा शनीची स्थिती खराब आहे, त्यांना अचानक होणारे अपघात, वादविवाद किंवा आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो. होलाष्टकची सुरुवात आजपासून झाली असून याचा शेवट 3 मार्चला होणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहणसुद्धा लागणार आहे, त्यामुळे या दोन्ही स्थितींचा प्रभाव व्यक्तींवर होण्याची शक्यता आधी आहे.
मानसिक अस्थिरता
राहूच्या प्रभावामुळे या काळात आत्महत्येचे विचार, नैराश्य किंवा प्रचंड संताप येण्याची शक्यता असते. समाजातही अशांतता किंवा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. या काळात राहूच्या प्रभावाचा मानसिक स्थितीवर अधिक परिणाम जाणवून येईल, पण अशावेळेस खचून न जात परिस्थिती समजून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा.
या काळात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?
ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये. धारदार वस्तू वापरू नये, कारण राहूचा प्रभाव गर्भावर नकारात्मक पडू शकतो. सूतक काळ सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत अन्न किंवा पाणी घेऊ नये. जुन्या अन्नात तुळशीची पाने टाकून ठेवावीत. कोणताही नवा व्यवसाय, व्यवहार किंवा प्रवास या दिवशी टाळावा. सूतक काळात देवघराचे दरवाजे बंद ठेवावेत आणि देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये. राहू वाणीमध्ये विष कालवू शकतो, त्यामुळे कोणाशीही वाद घालू नका.
राहूचे वाईट प्रभाव दूर करण्यासाठी हे उपाय करा
3 मार्च रोजी शेवटच्या होलाष्टकाला राहू खूप उग्र असेल, म्हणून तुम्ही या दिवशी प्रवास करणे टाळावे.
जर तुम्ही आग आणि लोखंडाशी संबंधित काम टाळले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील.
राहूला शांत करण्यासाठी, भगवान शिवाची पूजा करणे आणि शिव मंत्रांचा जप करणे प्रभावी ठरते.
जर तुम्ही तुमच्यासोबत चांदीचा तुकडा ठेवू शकलात तर राहू ग्रहाच्या वाईट प्रभावांपासून तुम्ही वाचू शकता.
यासोबतच, जर तुम्ही चंद्रग्रहणाच्या शेवटच्या दिवशी आणि होलाष्टकाला मोहरीचे तेल, लोखंडी वस्तू, काळे कपडे, काळे तीळ इत्यादी दान केले तर नकारात्मकता तुमच्यावर वर्चस्व गाजवत नाही आणि राहूचा वाईट प्रभावही दूर होतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
