25 जानेवारीला पौष पौर्णिमा -
प्रत्येक महिन्यात अमावस्येनंतर पौर्णिमा येत असते. पौष महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगास्नानासोबत दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं.
25 जानेवारी रोजी हे आश्चर्यकारक योग तयार होत आहेत -
हिंदू कॅलेंडरनुसार 25 जानेवारीला पौष पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, रवि, प्रीति योगासह गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर असेल. सकाळी 07.13 ते 08.16 पर्यंत रवि योग आहे. गुरुपुष्य आणि अमृत सिद्धी योग 25 जानेवारी रोजी सकाळी 8:16 ते 26 जानेवारी सकाळी 7:12 पर्यंत आहे.
advertisement
गुरुपुष्यामृत नक्षत्रात या गोष्टी खरेदी करा -
हरभरा डाळ -
25 जानेवारीला गुरुपुष्य योगात हरभरा डाळ खरेदी करू शकता, कारण ती गुरुशी संबंधित आहे. त्यामुळे कुंडलीत बृहस्पतिची स्थिती मजबूत होते, माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते.
सोने चांदी -
गुरु पुष्य योगात सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या गोष्टी सुख-समृद्धीच्या प्रतीक मानल्या जातात. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करू शकता. या दिवशी खरेदी केलेली संपत्ती वाढत जाते, असे मानले जाते.
रविवारी पुत्रदा एकादशीला श्रवण करावी ही व्रत कथा; विष्णू कृपेनं मिळेल खुशखबर
वाहन, मालमत्ता -
25 जानेवारी रोजी तयार होत असलेल्या योगामध्ये वाहन, घर किंवा कोणत्याही प्रकारची महत्त्वाची खरेदी करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
पूजेशी संबंधित गोष्टी -
25 जानेवारी रोजी तुम्ही सिंदूर, अक्षत, धार्मिक पुस्तके, देवी-देवतांची चित्रे इत्यादी पूजेशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता. याचे शुभ परिणामही तुम्हाला मिळतील.
पठण करा -
या अद्भुत योगात तुम्हाला काही खरेदी करणं शक्य नसल्यास देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्री सूक्ताचे पठण करा. असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)