बुरहानपुर : जर तुम्ही कर्जामुळे तणावात असाल आणि तुमच्या घरात वाद होत असतील, दारिद्र्याचा सामना करावा लागत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण आहे आणि अनेक वर्षांनी असा योग तयार झाला आहे. कर्जापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करू शकतात. मात्र, शुक्रवारी अक्षय तृतीयेला केलेला हा उपाय तुम्हाला निश्चितच मदत देऊ शकतो.
advertisement
पंडित शैलेंद्र मुखिया यांनी सांगितले की, जर तुम्ही कर्जामुळे तणावात असाल आणि तुमच्या घरात वाद होत असतील, तर त्याचे सर्वात मोठे कारण तुमच्या घरातील तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू आहेत. घरात पडलेली बंद घड्याळही याचे एक महत्त्वाचे कारण आहे. घरात बराच काळ ज्या वस्तूचा वापर होत नाही, अशी वस्तू राहूचे घर बनते आणि यामुळे समस्या निर्माण होतात. ही बाब वास्तूदोषाला कारणीभूत ठरते. त्यामुळे कर्ज आणि पैशांबाबत वाद वाढतात.
आजच करा हे काम -
जर तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल तर सर्वात आधी तुम्ही घरातील तुटलेल्या वस्तू बाहेर फेकून द्या. घरात बंद घड्याळ ठेवू नका. तसेच एकतर तिला चालू करा किंवा ती खराब झाली असेल तर भंगारात द्या. तुटलेले भांडे किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू घराबाहेर ठेवा. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी मदत होईल. या कामाची सुरुवात आज शुक्रवारपासून केली तर खूपच चांगले होईल.
अक्षय तृतीयेला सोने चांदी नव्हे तर या वस्तू खरेदी कराव्या, अन् मग पाहा फायदाच फायदा!
शुक्रवारी करा या मंत्राचा जप -
तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी सकाळी 11 वेळा ”ओम नमो वासुदेवाय नमः” मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय तुम्ही 11 शुक्रवारपर्यंत करा. या मंत्राचा जप करताना तुम्हाला ही सावधानी बाळगायची आहे की, तुम्ही स्नान करावे. त्यानंतर उपाय करावा. हा मंत्र तुम्हाला कर्ज आणि घरात येणाऱ्या सर्व संकटांपासून सुटका करेल. याशिवाय लक्ष्मी मातेचा मंत्र ”ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम:” मंत्राचा जप करावा. याशिवाय विष्णु सहस्त्रनामाचे पठण करावे. 11 शुक्रवार हे उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होईल आणि घरात संपत्ती येईल.
सूचना - ही माहिती ज्योतिषांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.