अक्षय तृतीयेला सोने चांदी नव्हे तर या वस्तू खरेदी कराव्या, अन् मग पाहा फायदाच फायदा!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Akshay Tritiya 2024 Tips : अक्षय तृतीयेला प्रत्येक ठिकाणी सोने खरेदीसाठी गर्दी केली जाते. मात्र, अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याबाबतचे कोणतेही प्रमाण शास्त्रात मिळत नाही असे ज्योतिषाचार्य डॉ. राजनाथ झा यांनी सांगितले आहे. हा दिवस गरीबांना दान पुण्य करण्यासाठी समर्पित मानला जातो, असेही ते म्हणाले. अशी मान्यता आहे की, या दिवशी केलेल्या पुण्याचे फळ कधीही संपत नाही. तसेच मनुष्याला याचा लाभही मिळतो. (उद्धव कृष्णा, प्रतिनिधी)
पाटणा येथील ज्योतिषाचार्य डॉ. राजनाथ झा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी तुम्ही सोने खरेदी करण्याऐवजी कापूस खरेदी करुन आपल्या घरी आणू शकतात. या दिवशी गरिबांची सेवा करण्याचा भाव शास्त्रात सांगितलेला आहे. तसेच तुम्ही कापूस खरेदी केल्याने एखाद्या गरिबाच्या खिशात काही पैसे जातील, यामुळे तुम्हालाच पुण्य मिळेल.
advertisement
अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही भांडे खरेदी केले, तर यामुळेही शुभ फळ मिळेल. या दिवशी अनेक जण गरिबांना अन्नदानही करतात. या दिवशी केलेले पुण्य तुमच्यासोबत कायम राहते, ते कधीही संपत नाही, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
advertisement
तुमची इच्छा असेल तर तुम्ही या शुभ दिवशी मोहरीसुद्धा खरेदी करू शकता. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मोहरी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते.
advertisement
advertisement
या कवड्यांना माता लक्ष्मीसोबत जोडले जाते. या दिवशी या कवड्यांची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. खरेदी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी ही काळानुरूप बाजारवादातून विकसित झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात हा दिवस धार्मिक कार्यासाठी समर्पित आहे. या दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते.
advertisement