TRENDING:

Ashadhi Wari 2025: टाळमृदंगाचा गजर, तब्बल सव्वा तीनशे वर्षांची परंपरा, संत मुक्ताईंची पालखी जालन्यातून पंढरपुरकडे रवाना, Video

Last Updated:

Ashadhi Wari 2025: जून महिना सुरू झाला की पंढरीच्या विठ्ठलाची ओढ वारकऱ्यांना लागत असते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम अशा विविध संतांच्या पायी दिंड्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी आतुर असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: जून महिना सुरू झाला की पंढरीच्या विठ्ठलाची ओढ वारकऱ्यांना लागत असते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम अशा विविध संतांच्या पायी दिंड्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी आतुर असतात. या सर्व दिंडी सोहळ्यात सर्वाधिक अंतर कापून पायी प्रवास करणारी महत्त्वाची दिंडी म्हणजे संत मुक्ताई यांची दिंडी. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर असे राज्याची चार विभाग ही दिंडी पायी प्रवास करते. 6 जूनला सुरू झालेली ही पायी दिंडी सध्या जालना शहरात आहे.
advertisement

मुक्ताईंच्या या पायी दिंडीची सुरुवात तब्बल सव्वा तीनशे वर्षे झाली आहेत. तब्बल दीड ते 2000 वारकरी या पायी दिंडीमध्ये सहभागी होतात. मुक्ताईनगर, बुलढाणा, जालना मार्गे ही दिंडी पंढरपूरला मार्गस्थ होते. साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास दिंडीतील वारकरी करतात. 29 दिवस पायी प्रवास केल्यानंतर आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी ही दिंडी पंढरपूरमध्ये पोहोचतेसंत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण संत मुक्ताई यांच्या पादुका जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे नेल्या जातातटाळमृदंगाच्या गजरात आणि अभंग, ओव्या, भजन, कीर्तन करत वारकरी मोठ्या उत्साहात या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात

advertisement

shravan month 2025: श्रावण महिन्यात...! कधीपासून कुठंपर्यंत धार्मिक विधी, किती श्रावण सोमवार असतील?

आतापर्यंत 28 वेळा मी दिंडी सोहळ्यात सहभागी झालो आहे. 95 पासून दिंडीमध्ये सहभागी होतो आहे. माझं वय 78 वर्षे आहे. जगात सुखशांती नांदावीकुठेही वाईट काही घडू नये अशी प्रार्थना मी विठ्ठलाला करणार आहे. संत विठ्ठल बळ देईल तोपर्यंत विठ्ठलाच्या चरणी जाण्याचा माझा प्रयत्न असेलअसं वयोवृद्ध आजोबा नारायण पाटील यांनी सांगितलं

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी
सर्व पहा

तर मध्य प्रदेशातील संजय सपकाळे हे देखील या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा ज्ञात आहेत. दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्याने आनंद मिळतो. कोणतीही अडचण नाहीसगळं आनंदात पार पडतंय. विठ्ठलाला भेटण्याची ओढ कोणताच त्रास जाणवू देत नाहीअसं त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: टाळमृदंगाचा गजर, तब्बल सव्वा तीनशे वर्षांची परंपरा, संत मुक्ताईंची पालखी जालन्यातून पंढरपुरकडे रवाना, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल