shravan month 2025: श्रावण महिन्यात...! कधीपासून कुठंपर्यंत धार्मिक विधी, किती श्रावण सोमवार असतील?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan month 2025: श्रावणात श्रावणी सोमवारांना विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवारी शिवभक्त उपवास करून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. यंदाच्या श्रावणाचे धार्मिक महत्त्व, श्रावण कधी सुरू होत आहे, पहिला श्रावण सोमवार कधी आहे, श्रावणी सोमवारच्या सर्व तारखा जाणून घेऊया.
मुंबई : श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना पूजा-विधींसाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. हा महिना विशेषतः महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. श्रावणात भोलेनाथाची पूजा केल्यानं आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि शांती लाभते, असे मानले जाते. श्रावणात श्रावणी सोमवारांना विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवारी शिवभक्त उपवास करून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. यंदाच्या श्रावणाचे धार्मिक महत्त्व, श्रावण कधी सुरू होत आहे, पहिला श्रावण सोमवार कधी आहे, श्रावणी सोमवारच्या सर्व तारखा जाणून घेऊया.
श्रावण महिना २०२५ कधी सुरू होईल?
या वर्षी २०२५ मध्ये श्रावण महिना २५ जुलै २०२५, शुक्रवारपासून सुरू होत आहे. दृक पंचांगानुसार, हा महिना विशेष शुभ राहील, शिव भक्तांना संपूर्ण ३० दिवस महादेवाची पूजा, प्रार्थना करण्याची संधी मिळेल. श्रावण महिन्यात शिवलिंगाला पाणी अर्पण करणे, रुद्राभिषेक करणे, महामृत्युंजय मंत्राचा जप करणे आणि सोमवारी उपवास करणे या गोष्टी विशेष फळदायी मानल्या जातात.
advertisement
पहिला श्रावण सोमवार कधी?
श्रावणात येणाऱ्या पहिल्या सोमवारला पहिला श्रावणी सोमवार म्हणतात. हिंदू धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. कित्येक शिवभक्त या दिवशी उपवास करून पूर्ण विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात. २०२५ मध्ये, पहिला श्रावणी सोमवार २८ जुलै २०२५ रोजी येईल. या दिवशी भक्तीने केलेली पूजा महादेवापर्यंत लगेच पोहचते, त्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
श्रावण सोमवार २०२५ तारखा -
पहिला सोमवार - २८ जुलै २०२५
दुसरा सोमवार - ४ ऑगस्ट २०२५
तिसरा सोमवार - ११ ऑगस्ट २०२५
चौथा सोमवार - १८ ऑगस्ट २०२५
शिवपूजन, शिवमूठ कधी -
पहिल्या श्रावण सोमवारी शिवपूजन, शिवामूठ तांदूळ अर्पण करणे, नागचतुर्थी उपवास, विनायक चतुर्थी, दुर्वा गणपती व्रत असे सगळे धार्मिक कार्ये एकाच दिवशी जुळून आले. शंकराच्या पूजेसाठी पहिला सोमवार खास असणार आहे. पहिल्या सोमवारचा उपवास करणाऱ्यांचे एकाच दिवशी अनेक उपवास घडणार आहेत. विनायक चतुर्थीचा उपवास यातूनच घडेल, त्यामुळे शिव परिवाराची कृपा भाविकांना मिळेल.
advertisement
श्रावण महिन्याचे महत्त्व -
श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना मानला जातो. असे मानले जाते की या महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान शिवाने विष पिऊन जगाचे रक्षण केले. तेव्हापासून या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. विशेषतः अविवाहित मुलींनी चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून सोमवारचे व्रत पाळावे. पूजा-विधी करणाऱ्यांवर संपूर्ण श्रावणात महादेवाची कृपा राहील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 15, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
shravan month 2025: श्रावण महिन्यात...! कधीपासून कुठंपर्यंत धार्मिक विधी, किती श्रावण सोमवार असतील?











