बाबा वेंगा यांची 2025-2026 ची भविष्यवाणी: बल्गेरियाच्या अंध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, 2025 पासून युरोप आणि अमेरिकेच्या भागात अशा काही घटना घडतील ज्या जगाच्या विनाशाची सुरुवात करतील. अमेरिकेचा व्हेनेझुएलावर झालेला हल्ला हा याच मोठ्या विनाशाची ठिणगी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नॉस्ट्रेडेमस यांचे 'मोठ्या युद्धा'चे संकेत: फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडेमस यांनी आपल्या 'लेस प्रोफेटिस' पुस्तकात लिहून ठेवले होते की, "एक मोठा महासागर ओलांडून येणारी शक्ती दक्षिण भागातील एका देशावर हल्ला करेल आणि त्यातून जगात रक्ताचे पाट वाहतील." व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील देश असल्याने ही भविष्यवाणी तंतोतंत जुळताना दिसत आहे.
advertisement
तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार: बाबा वेंगा यांच्या मते, 2026 हे वर्ष जगासाठी अत्यंत निर्णायक असेल. जर व्हेनेझुएलाच्या बाजूने रशिया किंवा चीन सारखे देश उभे राहिले, तर हे स्थानिक युद्ध तिसऱ्या महायुद्धात रूपांतरित होण्यास वेळ लागणार नाही. नॉस्ट्रेडेमस यांनीही एका 'मोठ्या जागतिक संघर्षाचा' उल्लेख केला आहे, जो अनेक वर्षे चालेल.
नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाचा संबंध: दोन्ही भविष्यवेत्त्यांनी सांगितले होते की, ज्या काळात ही युद्धे होतील, त्याच काळात निसर्गही कोपेल. सध्या जगभरात होत असलेले हवामान बदल, भूकंप आणि आता सुरू झालेला हा युद्धजन्य तणाव, या गोष्टी भविष्यवाण्यांच्या दिशेने जात असल्याचे संकेत देत आहेत.
सत्तेचे हस्तांतरण आणि नवीन जागतिक व्यवस्था: नॉस्ट्रेडेमस यांच्या भविष्यवाणीनुसार, या युद्धानंतर जुन्या महासत्तांचे पतन होईल आणि एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येईल. अमेरिकेची ही कारवाई त्यांच्या सत्तेसाठी शेवटचा प्रयत्न असेल की विनाशाचे कारण, हे काळच ठरवेल.
अंतराळातून येणारे संकट: विशेष म्हणजे, बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये अंतराळातून येणाऱ्या संकटाचाही उल्लेख केला होता. युद्ध सुरू असतानाच पृथ्वीवर एखादी मोठी खगोलीय घटना घडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली होती, जी मानवी संस्कृतीसाठी धोक्याची ठरू शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
