TRENDING:

शनिवारी अवश्य टाळा या चुका, ही अशुभ कामे केल्याने येतील अडथळे

Last Updated:

शनिवारी शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 9 ऑगस्ट: शनिवार हा शनिदेवाला समर्पित वार आहे. शनिदेव एखाद्या व्यक्तीला चांगल्या कर्मांचे चांगले फळ देतात आणि वाईट कर्मांची शिक्षा देतात. हिंदू धर्मात असे मानले जाते की ज्याचा शनी चांगला असतो, त्याला राजपद किंवा मोठे सौख्य मिळते. ज्याच्या कुंडलीत शनिदेवाची अशुभ दृष्टी असते, त्याला जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे शनिवारी लोक नियमानुसार शनिदेवाची पूजा करतात. त्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची अशुभ स्थिती शुभ होते. या दिवशी मोहरीचे तेल अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
News18
News18
advertisement

कोणत्या देवाला कोणता नैवेद्य अर्पण करावा? टाळा या कॉमन चुका

शनिवारी शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. अशी काही कामे आहेत, जी शनिवारी करू नयेत. असे मानले जाते की शनिवारी ही कामे केल्याने शनिदेवाचा कोप होतो. चला जाणून घेऊया ज्योतिषाचार्य पंडित गोविंद पांडे यांच्याकडून कोणती कामे शनिवारी करू नयेत याविषयी.

advertisement

मांससेवन आणि मद्य प्राशन टाळा

शनिवारी मांस आणि मद्य यासारख्या गोष्टींपासून अंतर ठेवावे. या दिवशी या पदार्थांचे सेवन अत्यंत घातक मानले गेले आहे. शनिवारी या गोष्टींचे सेवन करणे अशुभ मानले जाते. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रवास टाळा

शनिवारी पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेने प्रवास करणेदेखील अशुभ मानले जाते. विशेषत: पूर्व दिशेला दिशाभूल राहते. जर खूप महत्त्वाचे असेल तरच प्रवास करा. प्रवास करण्यापूर्वी आले किंवा अद्रक खा. प्रवास करण्यापूर्वी पाच पावले उलटे चालत जा, अन्यथा आपण शनीच्या वक्रदृष्टीचे बळी होऊ शकता.

advertisement

रुद्राक्ष धारण केल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्या, सर्व संकटांपासून होईल रक्षण

या गोष्टी खरेदी करू नका

शनिवारी तेल, लाकूड, कोळसा, मीठ, लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नयेत, अन्यथा अनावश्यक अडथळे निर्माण होतील आणि अचानक त्रास सहन करावा लागू शकतो.

केस आणि नखे कापू नका

शनिवारी केस कापणे, नखे कापणे, केस धुणे हे निषिद्ध मानले जाते. या दिवशी या सर्व गोष्टी केल्याने शनिदेवाचा कोप होतो, असे मानले जाते.

advertisement

या गोष्टी खाऊ नका

याशिवाय शनिवारी दूध आणि दह्याचे सेवन टाळावे. प्यायचे असेल तर त्यात हळद किंवा गूळ टाका. याशिवाय वांगी, आंब्याचे लोणचे आणि तिखट खाणेही या दिवशी टाळावेत, असे शास्त्रसंकेत आहेत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
शनिवारी अवश्य टाळा या चुका, ही अशुभ कामे केल्याने येतील अडथळे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल