कोणत्या देवाला कोणता नैवेद्य अर्पण करावा? टाळा या कॉमन चुका
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
मुंबई, 7 ऑगस्ट: आपल्याकडे पूजेबरोबरच देवाला संतुष्ट करण्यासाठी नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. प्रत्येक देवतेला विशिष्ट प्रसाद किंवा नैवेद्य आवडतो. देवाचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने भक्ताला समाधान, प्रसन्नता प्राप्त होते. परंतु बरेच जण अज्ञानामुळे देवतांना कोणतेही पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करतात. जाणून घेऊया नैवेद्यांविषयी परंपरेने चालत आलेली महत्त्वाची माहिती...
गणपतीचा नैवेद्य
गणपतीला मोदक किंवा लाडू आवडतात. याशिवाय तुम्ही बुंदीचे लाडूही देऊ शकता. गणपतीला उसाची तुकडे, जांभूळ, सुकी पुरी आणि गूळ खूप आवडतो.
श्रीरामाचा नैवेद्य
प्रभु श्रीरामांना केशरयुक्त खीर आणि कलाकंद हे संपूर्ण घरगुती जेवण आवडते.
advertisement
श्रीविष्णूचा नैवेद्य
भगवान विष्णूला मनुका अर्पण करावी. यासोबत आवळा अर्पण करणे खूप शुभ आहे. खीरमध्ये सुका मेवा घालावा आणि शेवटी तुळस घालावी. उत्तम प्रकारे बनवून विष्णुजींना अर्पण केल्यावर वाटून घ्या.
महादेवाचा नैवेद्य
महादेवाला भांग आणि पंचामृत (दूध, दही, मध, गंगेचे पाणी, तूप) आवडतात. श्रावण महिन्यात भगवान शंकराचा उपवास करून त्यांना गूळ, हरभरा, चिरोंजी याशिवाय दूध अर्पण केल्यास सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.
advertisement
हनुमंताचा नैवेद्य
खीर, लाल व ताजी फळे, गूळ, धणे आणि तुळस यांचे लाडू हनुमानजींना अर्पण केले जातात. शुद्ध तुपाने बनवलेले बेसन लाडूही भगवंताला आवडतात.
श्रीलक्ष्मीचा नैवेद्य
लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. असे म्हणतात की अर्थाशिवाय सर्व काही निरर्थक आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मंदिरात जाऊन आवडता भोग अर्पण करावा. लक्ष्मीला पांढरी आणि पिवळी मिठाई खूप आवडते.
advertisement
दुर्गेचा नैवेद्य
दुर्गामाता शक्तीची देवी मानली जाते. दुर्गामातेला खीर, मालपुआ, केळी, नारळ, भात आणि मिठाई खूप आवडते. जर तुम्ही मातेचे भक्त असाल तर बुधवार आणि शुक्रवारी मातेच्या मंदिरात जाऊन हा भोग अर्पण करा.
सरस्वतीचा नैवेद्य
माता सरस्वतीला दूध, पंचामृत, दही, लोणी, पांढरे तिळाचे लाडू आणि भाताचा लाडू आवडतात. हे मंदिरात जाऊन सरस्वतीजींना अर्पण करावे.
advertisement
ऑगस्टमध्ये सूर्य-शुक्रासह हे ग्रह आपला मार्ग बदलणार, या राशींना होणार लाभ
श्रीकृष्णाचा नैवेद्य
भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचे नैवेद्य खूप आवडतात.
महाकाली आणि भैरवाचा नैवेद्य
महाकाली आणि भगवान भैरवनाथ यांना जवळपास सारखाच नैवेद्य आवडतो. हलवा, पुरी आणि मद्य हे त्यांचे आवडते भोग आहेत. अमावस्येच्या दिवशी काली किंवा भैरव मंदिरात जाऊन त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. याशिवाय इमरती, जिलेबी आणि 5 प्रकारची मिठाईही दिली जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2023 2:14 PM IST